शिक्षक दिन - भाषण. जाणून घ्या गुरुचे महत्व.


शिक्षक दिन - भाषण. जाणून घ्या गुरुचे महत्व.

 गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।

गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`

       

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व विध्यार्थी मित्रांनो. आज 5 सप्टेंबर, शिक्षक दिन.या विषयावर मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.

      भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा  जन्मदिवस 5 सप्टेंबर 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाचे अनन्य साधारण महत्व असते.असा प्रत्येक व्यक्ती जो आपल्याला काहीतरी शिकवत असतो तो आपला गुरू असतो.*आई* हा प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिला गुरू असतो.


      डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्‍यातही सुरूच राहिल. 1962 मध्ये डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले.

       शिक्षक दिन हा केवळ भारतातच साजरा केला जातो असं नाही... जगभरात वेगवेगळ्या दिवशी का होईना पण हा दिवस साजरा करतात. युनेस्कोनं ५ ऑक्टोबर हा आंतराराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून जाहीर केलाय. पण, भारतात मात्र राधाकृष्ण यांच्या सन्मानार्थ ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९६२ साली ते राष्ट्रपतीपदावर विराजन झाले होते. तेव्हा काही शिष्य आणि प्रशंसकांनी त्यांना त्यांचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परवानगी मागितली. ‘माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रुपात साजरा करणं माझ्यासाठी गौरवास्पद आहे’ असं त्यावेळी राधाकृष्ण यांनी सांगितलं. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकं मुलांना पढवून संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे. फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो, असं त्यांचं म्हणणं होतं...


      शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमुल्यन केला जात असल्याचे चित्र समाजात दिवस आहे. तसेच गुरू-शिष्य संबंधांमधील पवित्र भावना लोप पावत आहे. या संबंधामधील पावित्र्य कायम ठेवण्‍यासाठी व डॉ. राधाकृष्णन् यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो.


      शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात.

      आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाट असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षणा देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचा महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.जीवनात शिक्षकाची जागा कोणीही घेऊ शकत नाही.असा एकही व्यक्ती शोधूनही सापडणार नाही की ज्याच्या आयुष्यात गुरू आला नाही.मानवाला गुरू असल्याकारणाने माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा दिसतो.शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात. कारण ते एक मार्गदर्शकाची भूमिका निभावून योग्य मार्गदर्शन करतात. एका व्यक्तीला धोक्यापासून वाचविण्याची आणि चांगल्या मार्गाकडे नेण्याची क्षमता फक्त शिक्षकांमध्ये असते. तसेच शिक्षकांकडे आपल्या देशाबद्दल प्रेम आणि देशभक्ती निर्माण करण्याची शक्ती असते.

     एखाद्याच्या आयुष्यात निराशा आली असेल, किंवा मार्गदर्शन पाहिजे असेल तर तो गुरू कडे जातो.गुरू अगदी निस्वार्थी पणे आपल्या शिष्यांना स


     शिक्षकांची महती, गुरू चे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात इतके मोठे आहे की फक्त एक दिवस शिक्षक दिन साजरा करून त्यांचे ऋण आपण फेडू शकत नाही.शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकाचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा व्हायला पाहिजे.महात्मा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस देखील शिक्षक दिन म्हणून साजरा करायला पाहिजे.मुलींच्या शिक्षणासाठी या दाम्पत्याने केलेले कार्य अमूल्य आहे.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचे जन्मदिन पण शिक्षक दिन म्हणून साजरे करायला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने त्यांचा उचित सन्मान होईल.

 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या विषयी अधिक वाचण्यासाठी खाली पहा.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्




  

Tags: