मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

 वाचन प्रेरणा दिन विशेष

     या विश्वात अनेक जण जन्माला येतात, आपलं आयुष्य जगतात व शेवटी जगाचा निरोप घेतात.पण चिरकाल तेच अजरामर होतात जे समाजासाठी जीवन जगतात. जे स्वतः साठी जीवन जगतात ते नष्ट होतात, मात्र जे इतरांसाठी जीवन जगतात ते अजरामर होतात. अशाच एका आजरामर व्यक्तिमत्वाची माहिती आपण घेणार आहोत.


सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने तो वो हैं जो नींद आने नहीं देते।


मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम


          ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तामिळनाडूमधील रामेश्वरम् येथे झाला होता.ते एक एरोनॉटिकल अभियांत्रिक(इंजिनिअर) होते. त्यांनी डी.आर डी.ओ. मध्ये कार्य केले व भारताच्या अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ प्रक्षेपण अस्त्रांची निर्मिती केली. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते इस्रोचे वैैज्ञानिक होते. डॉ. कलाम हे भारताच्या अंतराळ कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात सहभागी होते. या कारणास्तव त्यांना "मिसाईल मॅन" असेही म्हणतात. २००२ मध्ये कलाम हे भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि ५ वर्षांच्या कार्यकाळानंतर ते शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवेत परत गेले.


अगर तुम सूरज की तरह चमकना चाहते हो तो पहले सूरज की तरह जलो। 


शिक्षण

       अब्दुल कलाम यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या-आणण्याचा व्यवसाय करीत. मुलाच्या महाविद्यालयातील प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. त्या काॅलेजातून अवकाशसंशोधन(एरोनाटिक्स)चा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. , त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला.

कार्य

        १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

   

जीवन एक कठिन खेल है। आप एक व्यक्ति होने के अपने जन्मसिद्ध अधिकार को बनाये रखकर इसे जीत सकते हैं।


        विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.


इंसान को कठिनाइयों की आवश्यकता होती है, क्योंकि सफलता का आनंद उठाने के लिए ये ज़रूरी हैं।

राष्ट्रपतीपदी निवड

         २००२ च्या निवडणुकीच्या निवडणुकीत ९,२२,७८४ मतदारांच्या मतांनी लक्ष्मी सहगल यांनी मिळवलेल्या १,०७,३६६ मतांना मागे टाकीत कलाम यांना राष्ट्रपती केले. कलाम भारताच्या प्रजासत्ताक देशाच्या ११व्या अध्यक्षपदावर यशस्वी ठरले आणि २५ जुलै रोजी शपथ घेण्याआधी राष्ट्रपती भवनमध्ये दाखल झाले. यांना राष्ट्रपती बनण्यापूर्वी भारत रत्न हा भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान मिळाला होता. असे कलाम हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. यापूर्वी डॉ सर्वेपल्ली राधाकृष्णन (१९५४) आणि डॉ.जाकिर हुसेन (१९६३) हे आधी भारतरत्नचे लाभकर्ते होते व नंतर भारताचे राष्ट्रपती झाले. कलाम हे राष्ट्रपती भवनवर आलेले प्रथम शास्त्रज्ञ होते.


         कलाम यांच्या अध्यक्ष म्हणून केलेल्या कामामुळे त्यांना पीपल्स प्रेसिडेंट म्हणतात.त्यांनी सांगितले की, त्यांचे कार्यकालात प्रॉफिट बिल ऑफिसवर घेण्यात आलेले निर्णय सर्वात कठीण होते. आपल्या कार्यकाळात त्यांना सादर केलेल्या २१ दया याचिकापैकी २० फेटाळून लावल्यामुळे कलाम यांच्यावर टीका झाली. कलाम यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात बलात्कार करणाऱ्या धनंजय चॅटर्जी यांच्या दयायाचिकेस नकार दिला.त्यांनी २००५ मध्ये बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. सप्टेंबर २००३मध्ये, पीजीआय चंदीगडमधील परस्पर संवादात, कलाम यांनी देशातील लोकसंख्या लक्षात घेऊन, भारतातील समान नागरी कायदा असण्याच्यी आवश्यकता प्रतिपादित केली. 


अपने मिशन में कामयाब होने के लिए, आपको अपने लक्ष्य के प्रति एकचित्त निष्ठावान होना पड़ेगा।


जीवनपट

जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.

शिक्षण : श्वार्ट्‌झ (Schwartz) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी (१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली (१९६०).

१९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.

१९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.

१९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.

१९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.

१९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक

१९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)

१९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त

१९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.

१९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.

१९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.

१९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.

१९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री व डी.आर.डी.ओ.चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) हा रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

१९९४ : 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित.

२५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त.

२००१ : सेवेतून निवृत्त.

२००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.


निधन

         ए.पी.जे. अब्दुल कलाम २७ जुलै २०१५ रोजी कलाम शिलॉंग येथे भारतीय शास्त्र व्यवस्थापन शिलॉंग येथे "पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे" या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेले. पायरीवरून जात असताना त्यांना काही अस्वस्थ वाटले, परंतु थोड्या विश्रांतीनंतर सभागृहात प्रवेश करण्यास सक्षम झाले. संध्याकाळी सुमारे साडेसाहा वाजता व्याख्यान देताना ते स्टेज वरून कोसळले. त्यांना जवळच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; आगमनानंतर त्यांच्यात नाडी किंवा जीवनाची इतर चिन्हे दिसली नाहीत. आयसीयूत युनिट मध्ये ठेवण्यात आले तरी कलाम यांना ७-४५ला हृदयविकाराच्या दुसऱ्यायानंतर मृत घोषित करण्यात आले.



शिक्षण एक बहुत ही महान पेशा है जो किसी व्यक्ति के चरित्र, क्षमता, और भविष्य को आकार देता हैं। अगर लोग मुझे एक अच्छे शिक्षक के रूप में याद रखते हैं, तो मेरे लिए ये सबसे बड़ा सम्मान होगा।


अशा या महान व्यक्तिमत्वाला व त्यांच्या कार्याला मनापासून सलाम!!!!


Tags: