पेशी - सजीवांचे एकक
- पेशीरचना सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे.
- सर्व सजीव पेशीपासून बनलेले असतात.
- पेशी सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे.
पेशीचा शोध रॉबर्ट हूक यांनी 1665मध्ये लावला.
आर.विरशॉ -1885-
सर्व पेशींचा जन्मा हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशी मधूनच होतो.
एम.जे श्लायडेन व थिवोडर श्वान -
1838- सर्व सजीव पेशीपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचे पायाभूत घटक आहे.
आंटोन ल्युवेन्हाक - 1673-
सूक्ष्मदर्शक तयार केले जिवाणू आदिजीव यांच्या जिवंत पेशी चे सर्वप्रथम निरीक्षण केले.
पेशींच्या आकारमानाचे मोजमाप करण्यासाठी मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर एककाचा वापर केला जातो.
1मायक्रोमीटर = 1000 नॅनोमीटर
पेशींचा आकार -
सजीवांच्या पेशींच्या आकारात विविधता असते पेशींचा आकार कार्याशी निगडित असतो.
पेशी अंगके -
सजीवांच्या जीवन क्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात या घटकांनाच पेशी अंगके म्हणतात.
पेशींचे प्रकार - वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी असे दोन प्रकार पडतात.
पेशीभित्तिका -
हे पेशीचे सर्वात बाहेरचे आवरण असते पेशीभित्तिका फक्त वनस्पती पेशी मध्येच असतात.
पेशिभित्तिका सेल्युलोज ने बनलेली असते.
ही अजैविक असते.
पेशीला आकार देणे व संरक्षण देणे हे पेशिभित्तिकेचे कार्ये आहे.
पेशीपटल -
यालाच प्रद्रव्यपटल म्हणतात.
मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग.
पातळ आवरण असून ते नाजूक व लवचिक असते. प्राणी पेशी चे सर्वात बाहेरचे आवरण असते.
✒️ पेशीद्रव्य -
पेशीद्रव्य हे पेशीपटल आणि केंद्रक यांच्या दरम्यान असते. पेशींची विविध अंगके यामध्ये विखुरलेली असतात.
✒️ केंद्रक -
पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंगक आहे. पेशीचे सर्व कार्य केंद्रकच नियंत्रित करते.
पेशी विभाजन महत्त्वाची भूमिका असते.
✒️ तंतुकणिका -
तंतुकणिका ऊर्जा तयार करतात म्हणून त्यांना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात.
लोहित रकतपेशिमध्ये तंतुकानिका नसतात.
✒️ रिक्तिका -
पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतात. प्राणी पेशी मधील रीक्तिका आकाराने छोटे असतात.
सर्व पेशींचा जन्मा हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशी मधूनच होतो.
मानवी शरीरातील सर्व पेशी टोकाला टोक लावून सलग जोडल्यास पृथ्वी भोवती साडे चार फेऱ्या होऊ शकतील.
पेशीच्या अभ्यासाच्या शास्त्राला पेशीशास्त्र cytology म्हणतात.
पेशी व पेशी अंगके - QUIZ सराव चाचणी सोडवा