जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना NASA & ISRO भेट, जि.प. रत्नागिरीचा स्तुत्य उपक्रम

 


 जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना NASA & ISRO भेट,रत्नागिरी जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम. 


        रत्नागिरी जिल्हा परिषद, जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यासाठी NASA व ISRO भेटीचा उपक्रम राबवत आहे. विमान प्रवासाचे अनेक जणांचे स्वप्न असते, मात्र आयुष्यभर ते पूर्ण होऊ शकत नाही. मात्र जिल्हा परिषद शाळेतील मुलांना ही संधी उपलब्ध करून देणार आहे.या उपक्रमाविषयी संपूर्ण जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमाविषी सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

✒️ फक्त रत्नागिरी जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना संधी. ( 30सप्टेंबर 2022 पूर्वी रत्नागिरी जिल्हापरिषद शाळेत दाखल झालेला असावा)


✒️  चार टप्यावर चाळणी परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.

1) केंद्रस्तर

   केंद्रातील इयत्ता 5वी ते 7वी चे सर्व विद्यार्थी परीक्षेस बसू शकतात. कोणत्याही प्रकारची फी असणार नाही. केंद्रातील सर्व मुलांसाठी केंद्र शाळेत परीक्षा केंद्र असेल. जर केंद्राची संख्या 300 पेक्षा जास्त असेल तर दोन केंद्र असतील.

2) बीटस्तर

  प्रत्येक केंद्रातील पाहिले 10विद्यार्थी बीटस्तरावर परीक्षेस बसतील.

3) तालुका स्तर

   प्रत्येक बीट मधील गुणवत्ता यादीत आलेले ठराविक विद्यार्थी तालुका स्तरावर चाळणी परीक्षा घेण्यात येईल.

4) जिल्हा स्तर

  प्रत्येक तालुक्यात गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर परीक्षा घेण्यात येईल.


✒️ NASA भेटीसाठी प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे 9 तर ISRO भेटीसाठी प्रत्येक तालुक्यातील 3 याप्रमाणे एकूण 27 विद्यार्थी निवडण्यात येतील.

 जानेवारी 2023 मध्ये ISRO भेट तर मार्च 2023 मध्ये NASA भेट नियोजित.

परीक्षेचे स्वरूप

@ केंद्र व बीट स्तरावर परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल.

@ एकूण 50 प्रश्न असतील तर 100 गुण असतील. प्रत्येक प्रश्न 2 गुण.

@ प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकच असेल, पर्यायसमोर बरोबर ची टीकमार्क करायची असेल. दोन ठिकाणी टीकमार्क असतील तर शून्य गुण दिले जातील.

@ परीक्षा 30 नोव्हेंबर 2022 रोजी केंद्र स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे.

@ समान गुण पडले तर पहिल्या 20 प्रश्नात ज्याला जास्त गुण असतील तो पुढे जाईल.

@ तालुका व जिल्हा स्तरावर 75% वस्तुनिष्ठ तर 25% विज्ञानातील एका विषयावर निबंध लेखन असे स्वरूप असेल

अभ्यासक्रम

इयत्ता 5 वी ते 7 वी विज्ञान

एकूण 50 उपघटक आहेत.

प्रत्येक घटक निहाय या ब्लॉगवर माहिती दिली जाईल.




1) NASA

NATIONAL AERONAUTICS AND SPACE ADMIMISTRATION

मुख्यालय  - WASHINGTON D.C. UNITED STATES

स्थापना - 29 July 1958

अंतराळ संशोधन करणारी आंतररष्ट्रीय संस्था.

अधिक माहितीसाठी क्लिक करा.


2) ISRO 

INDIAN SPACE RESEARCH ORGANISATION

मुख्यालय - बेंगलोर 

स्थापना - 15 ऑगस्ट 1969 

संस्थापक - विक्रम साराभाई. 

अंतराळ संशोधन करणारी भारतीय संस्था.

अधिक माहितीसाठी क्लिक करा.