नैसर्गिक संसाधने - हवा, पाणी आणि जमीन.
पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे.
पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन यांनी बनला आहे यालाच जलावरण व शिलावरण म्हणतात.
पृथ्वीवर ७१ % भाग पाण्याने व 29 % भाग जमिनीने व्यापलेला आहे.
वातावरणातील हवेत सर्वात जास्त नायट्रोजन 78% ऑक्सिजन 21% आरगॉन 0.9% व इतर 0.07% आणि कार्बन डाय-ऑक्साइड 0.03% असतो.
तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूंच्या 80 टक्के वायू असतात तर पितांबर मध्ये 19 टक्के वायू असतो. दलांबर व आयनांबर मध्ये हे प्रमाण कमी कमी होत जाते.
वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो त्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजीवांचे रक्षण होते.
वातानुकूलन यंत्रे (AC) रेफ्रिजरेटर यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लूरोकार्बन्स तसेच टेट्राक्लोराइड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनच्या थराचा नाश होतो.
16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन संरक्षण दिन आहे.
हवेतील वायूंचे उपयोग
नायट्रोजन
सजीवांना आवश्यक प्रथिने मिळण्यास मदत करतो.
अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो.
ऑक्सिजन-
सजीवांना श्वसनासाठी, ज्वलनासाठी उपयोगी पडतो.
कार्बन डाय-ऑक्साइड-
वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात.
अग्निशामक नळकांड्या मध्ये या वायूचा उपयोग होतो.
अरगाँन-
विजेच्या बल्ब मध्ये वापरतात.
हेलियम -
कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्यांच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो.
निऑन -
जाहिरातीसाठीच्या, रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो.
क्रिप्टॉन-
फ्लोरोसेंट पाईप मध्ये वापर होतो.
झेनॉन -
फ्लॅश फोटोग्राफी मध्ये उपयोग होतो.
इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक
@ नायट्रोजन डायॉक्साईड
@ कार्बन डाय-ऑक्साइड
@ कार्बन मोनॉक्साईड
@ सल्फर डायऑक्साइड
@ काजळी
पाणी
जमिनीवर एकूण 97 % पाणी समुद्र व महासागर यामध्ये खाऱ्या पाण्याच्या स्वरूपात आहे तर एकूण गोडे पाणी 3 % आहे. एकूण गोड्या पाण्यापैकी 2.7% पाणी बर्फाच्या स्वरूपात आहे तर पिण्यासाठी उपलब्ध गोडे पाणी फक्त 0.3 उपलब्ध आहे.
कुथित मृदा (ह्युमस)
मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होऊन मृदेवर जो थर तयार होतो त्याला कुथित मृदा म्हणतात.
भारतीय हवामानशास्त्र संस्थेची 1875 मध्ये स्थापना झाली.
या संस्थेचे काही कार्य खालील प्रमाणे.
@ हवामान विषयक अंदाज वर्तविणे
@ हवामान बदलाविषयीचे संशोधन करणे
@ पर्जन्याचे अंदाज वर्तविणे
@ जागतिक तापमान वाढ निरीक्षण करणे
- आंतरराष्ट्रीय प्लास्टिक मुक्ती दिवस 3 जुलै आहे.
- जागतिक हत्ती दिवस 12 ऑगस्ट आहे.
- जागतिक क्षयरोग दिवस 24 मार्च आहे.
- जागतिक पर्यावरण दिन 5 जून आहे