पदार्थाच्या अवस्था व गुणधर्म - इयत्ता ६ वी
सरावासाठी प्रश्न व त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी खालील मुद्दे सविस्तर काळजीपुर्वक वाचा
- नादमयता म्हणजे काय?
- धातूंचे कोणते गुणधर्म असतात?
- वर्धनीयता म्हणजे काय?
- धातू कोणत्या स्वरूपात भूगर्भात सापडतात?
- संप्लवन म्हणजे काय?
- कोणता पदार्थ वितळवून मेणबत्ती बनवतात?
- द्रवरूप नायट्रोजन चा उपयोग काय?
- फ्रिजच्या फ्रिजरमधील हवेचे तापमान किती असते?
- वाफेचे संघनन किती अंश सेल्सिअसला होते?
- कोणताही पदार्थ प्रसरण कधी पावतो?
- मानवी शरीराचे तापमान किती असते?
- पदार्थाचे अवस्थांतर म्हणजे काय?
- पदार्थाच्या कोणकोणत्या अवस्था असतात?
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी खालील भाग सविस्तर काळजीपूर्वक वाचा.
@@ पदार्थाच्या स्थायू द्रव व वायू अशा अवस्था असतात.
पदार्थाचे अवस्थांतर -
पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो त्या क्रियेस पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात.
@@ तापमापक हे उपकरण तापमान मोजण्यासाठी वापरतात.
@@ मानवी शरीराचे सामान्य तापमान ३७ अंश सेल्सियस किंवा ९८.६ अंश फॅरनहाईट असते.
- कोणताही द्रव पदार्थ, त्याचे तापमान वाढले की प्रसरण पावतो व थंड होतांना आकुंचित होतो हे तत्त्व पारंपारिक तापमापक यंत्रात वापरले जाते.
- तापमापकांत दोन महत्त्वाचे भाग असतात. तापमान संवेदक (उदा. पारा, अल्कोहोल) ज्याचे आकारमान उष्णतेने वाढते आणि मापन तालिका ज्याद्वारे प्रसारित आकारमान मोजता येते.
- तापमापनाची एकके फॅरेनहाईट,सेल्सियस,सेंटीग्रेड, केल्विन इत्यादी.
- शुद्ध पाण्याचे समुद्रसपाटीला उत्कलन 100 अंश सेल्सिअस तापमानाला होते. हा पाण्याचा उत्कलनांक होय.
@@ संघनन-
- पाण्याची वाफ थंड झाली तर एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते या क्रियेला संघनन म्हणतात.
- वाफेचे संघनन 100 अंश सेल्सिअसलाच होते. म्हणजेच पाण्याचा उत्कलनांक व संघननबिंदू हा एकच असतो.
@@ गोठणबिंदू-
- ज्या तापमानावर पाणी अधिक थंड न होता ते गोठू लागते त्याला पाण्याचा गोठणबिंदू म्हणतात.
- 0 अंश सेल्सिअस हा पाण्याचा गोठणबिंदू आहे
- फ्रिजच्या फ्रिजरमधील हवेचे तापमान सुमारे -१८ अंश सेल्सिअस असते.
प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट उत्कलन बिंदू असतो तोच त्याचा संघनन बिंदूही असतो.
प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट गोठणबिंदू असतो तोच त्याचा विलायबिंदूही असतो.
@@ अवस्थांतराचे विविध उपयोग @@
- पँराफिन वक्स (मेन) वितळून मेणबत्ती बनवतात.
- गोठवलेला कार्बन डाय-ऑक्साइड (शुष्क बर्फ) आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी वापरतात.
- द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी व पशुंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी होतो.
- वाळू वितळवून काच बनवली जाते.
@@ संप्लवन
- स्थायूरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे याला संप्लवन म्हणतात.
- कापूर हे संप्लवन चे उदाहरण आहे.
@@ धातू-
- तांबे, सोने, लोह अशा पदार्थांना धातू म्हणतात.
- धातू खनिज रुपात भूगर्भात सापडतात.
@@ धातूंचे गुणधर्म @@
वर्धनीयता -
- धातूंचे ठोकून पत्रे तयार करता येतात या गुणधर्माला वर्धनीयता म्हणतात.
विद्युतवाहकता -
- धातू मधून वीज वाहते. सर्व धातू विजेचे कमी अधिक प्रमाणात वाहक असतात या गुणधर्माला विद्युतवाहकता म्हणतात.
- धातू उष्णतेचे वाहक असतात.
- धातूंना विशिष्ट चकाकी असते.
- धातूंचा आवाज झाला तर तो खणखणीत असतो त्याला धातूंची नादमयता म्हणतात.