अन्न व अन्नसुरक्षा, पोषक द्रव्ये - पोषण आणि आहार - जीवनसत्वे
सरावासाठी प्रश्न व त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी खालील मुद्दे सविस्तर काळजीपुर्वक वाचा
- पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे कोणती आहेत?
- खनिजे म्हणजे काय?
- कोणती जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाहीत?
- अ जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो?
- रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो?
- जीवनसत्व क अभावी कोणता रोग होतो?
- शरीरात कॅल्शियम व फॉस्फरस चे प्रमाण कोणते जीवनसत्व नियंत्रित ठेवते?
- जीवनसत्व डी अभावी कोणता रोग होतो?
- स्नायू पेशींना कार्यक्षम ठेवण्याचे काम कोणते जीवनसत्व करते?
- पोषण म्हणजे काय?
- अन्नातील पोषक तत्त्वांचे मुख्य प्रकार कोणते?
- उष्णता मोजण्यासाठी कोणत्या एककाचा उपयोग केला जातो?
- आपली ऊर्जेचे मुख्य गरज कशापासून भागते?
- ग्लिसरॉल किंवा स्टेरॉईडच्या स्वरूपात काय आढळते?
- एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते?
- प्रथिने कशाचे बनलेले असतात?
- विकरे व संप्रेरके कशापासून बनलेले असतात?
- कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावाने अनेमिया होतो?
- रक्त गोठ्ण्यासाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे असते?
- कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही हा रोग होते?
वरील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी खालील मुद्दे सविस्तर काळजीपुर्वक वाचा
- सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्यांचा वाढ व इतर सर्व कामांसाठी वापर करणे या प्रक्रियेला पोषण म्हणतात.
- या कामासाठी उपयोगी पडणाऱ्या अन्न घटकांना पोषक तत्वे म्हणतात.
- कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे आपल्या अन्नातील पोषक तत्वांचे मुख्य प्रकार आहेत
- कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, खनिजे व जीवनसत्वे यांना ऊर्जादायी पोषकतत्वे असे म्हणतात.
@@ उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी या एककाचा उपयोग होतो म्हणून अन्नपदार्थापासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठी किलो कॅलरी हे एकक वापरले जाते.
कर्बोदके
- आपली मुख्य गरज ऊर्जेची असते आणि ती कार्बोदाकामुळे भागते.
- कर्बोदके आपल्याला तृणधान्यातून मिळतात.
- कर्बोधके हे कार्बन ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या अनूपासून बनतात.
- पाण्यात विरघळणारे कर्बोदके म्हणजे शर्करा होय.
- जीवसृष्टीमध्ये कर्बोदके सर्वाधिक प्रमाणात आढळतात.
- कार्बोद्काचे कार्ये
- मानवी शरीराला सर्वात जास्त म्हणजे 60 ते 70 टक्के ऊर्जा कर्बोदकांमधून मिळते.
- एक ग्रॅम कर्बोदकापासून चार कॅलरी ऊर्जा मिळते.
- स्निग्ध पदार्थाचे चयापचय होण्यासाठी कर्बोदके मदत करतात.
स्निग्ध पदार्थ
- स्निग्ध पदार्थ पाण्यात न विरघळणारे चरबीयुक्त आणि हायड्रोजन, ऑक्सिजन व कार्बन यांच्या रेणुने बनलेले पदार्थ असतात.
- हे ग्लिसरॉल किंवा स्टेरॉईडच्या स्वरूपात आढळतात.
स्निग्ध पदार्थाचे कार्य
- शरीराला मेदापासून जास्तीत ऊर्जा मिळते.
- एक ग्रॅम मैदा पासून नऊ कॅलरी ऊर्जा मिळते.
- त्वचेखालील मेद शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते.
- शरीरात स्निग्ध पदार्थ जास्त झाले तर लठ्ठपणा वाढतो.
प्रथिने
- प्रथिने हे अमिनो आम्लाच्या श्रंखलेने बनलेले असतात.
- प्रथिनात कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन व नायट्रोजन चे अनु असतात.
प्रथिनांचे कार्य
- आपल्या शरीरात प्रतिकारक्षमतेमध्ये भाग घेणारे प्रतिद्रव्य हे प्रथिनापासूनच बनतात.
- सर्व विकारे हे प्रथीनापासून बनतात.
- शरीरातील बरेचसे संप्रेरक हे प्रथिनापासून बनलेले असते.
- शरीरातील ऑक्सिजनचे वहन करणार आहे हिमोग्लोबिन हा प्रतिना पासूनच बनलेला असतो.
- आपल्या शरीराच्या एकूण ऊर्जेच्या 10 ते 12 टक्के ऊर्जा प्रथिना पासून मिळते.
- शरीराच्या वाढीसाठी व शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते
खनिजे व जीवनसत्वे
शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थाची गरज असते त्यांना खनिजे म्हणतात.
@खाली काही खनिजे व त्यांचे उपयोग दिलेले आहेत @
- लोह- शरीराच्या सर्व भागापर्यंत ऑक्सिजनचे वहन करणे .
- कॅल्शियम व फॉस्फरस - दात हाडे मजबूत करणे .
- आयोडीन - वाढीचे नियंत्रण ,शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करणे.
- सोडियम व पोटॅशियम - शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे, चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया चालू ठेवणे.
जीवनसत्वे-
- ब व क जीवनसत्वांना पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे म्हणतात.
- म्हणजेच ती जल विद्राव्य जीवनसत्वे आहेत .ती लघवी ,घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात .
- अ ,ड ,ई ,के ही जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाहीत म्हणून यांना जल अविद्राव्य जीवनसत्वे म्हणतात .ती स्निग्ध पदार्थात म्हणजेच शरीरातील मेदात विरघळतात.
जीवनसत्वे - कार्य व अभावाने होणारे रोग.
जीवनसत्व -A-अ {रेटीनोल}
- डोळ्याचे रक्षण, त्वचा, दात,हाडे निरोगी राखणे.
- प्रतिकार क्षमतेत वाढ.
- या जीवन सत्वाच्या आभावाने रातांधाळेपणा होतो.
- याच्या अभावाने पुरुषात शुक्राणू निर्मितीत अडथला येतो.
जीवनसत्व - क - K
- रक्त गोठ्ण्यासाठी मदत
- वार्धक्य विरोधी जीवनसत्व
- याच्या अभावाने स्कर्व्ही नावाचा रोग होतो.
- किडनी स्टोन निर्माण होतो.
- हाडातील कॅल्चीम कमी होतो.
जीवनसत्व-डी - D
- शरीरात कॅल्शियम व फॉस्फरस चे प्रमाण नियंत्रित ठेवते.
- हादांचा व दातांचा विकास घडवून आणते.
- हे जीवनसत्व शरीरात तयार होते.
- आपल्या शरीरात स्टेरॉल असते याला सूर्यप्रकाश मिळताच याचे रूपांतर ड जीवनसत्वात होते म्हणून सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्याने हाडांचा विकास होतो.
- दात व हाडे निरोगी राहण्यासाठी पुरेसे कॅल्शियम व फॉस्फरस अन्नातून शोषून घेणे.
- या जीवनसत्वाचे अभावाने लहान मुलांमध्ये मुडदूस होतो.
- मोठ्या व्यक्तीमध्ये अस्थिमृदूता येते.
जीवनसत्व- इ - E
- पेशी मध्ये चयापचय क्रिया सुरळीत होणे.
- पुनरुत्पादन आणि स्नायू पेशींना कार्यक्षम राखणे.
- वांझपणा विरोधी जीवनसत्व
जीवनसत्व - के- K
- रक्त साकळण्यास मदत होणे.
- रक्त गोठण जीवनसत्व
- ग्लुकोजचे ग्लायकोजन मध्ये रुपांतर
जीवनसत्व बी1- थायमिन
चेता तंतूचे व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणे.
या जीवनसत्वाच्या अभावाने बेरीबेरी हा रोग होतो.
जीवनसत्व बी 7-
याच्या अभावाने अनेमिया होतो.
जीवनसत्व बी 9-
शरीराची वाढ होणे.
जीवनसत्व बी 12 -
लाल रक्तपेशी तयार करणे.