इस्रोचे अंतराळ केंद्रे - भारतीय अंतराळ कार्यक्रम भाग 1


इस्रोचे अंतराळ केंद्रे - भारतीय अंतराळ कार्यक्रम भाग 1

खालील सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचून त्यांच्या उत्तरासाठी खाली दिलेले मुद्दे सविस्तर अभ्यासा.

  1. INCOSPAR या संस्थेची स्थापना कधी झाली?
  2. इस्रो या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
  3. विक्रम साराभाई स्पेस सेंटर कोठे आहे?
  4. इसरो चे मुख्यालय कोणत्या शहरांमध्ये आहे?
  5. विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये कोणत्या उड्डाण वाहनांची निर्मिती करण्यात आली?
  6. इसरो सॅटॅलाइट सेंटर कोणत्या शहरांमध्ये आहे?
  7. सध्या IRS व INSAT या प्रकारच्या उपग्रहाचे बांधणे कोणत्या केंद्रामध्ये केली जाते?
  8. सतीश धवन स्पेस सेंटर कोठे स्थित आहे?
  9. SHAR म्हणजे काय?
  10. SHAR या केंद्राचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?
  11. भारतातून अवकाशात सोडण्यात येणाऱ्या सर्व उपग्रहांचे उड्डाण कोठून केले जाते?
  12. उपग्रहांनी पृथ्वीवरील संसाधनाबाबत पाठविलेल्या माहितीची पाहणी करून ओळख कोठे केले जाते?                  

  • भारतीय अंतराळ कार्यक्रम

  • 1962 मध्ये इंडियन नॅशनल कमिटी ऑन स्पेस रिसर्च INCOSPAR या संस्थेच्या स्थापनेपासून भारतीय अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात झाली.
  • या संस्थेची स्थापना डॉक्टर विक्रम साराभाई व त्यांच्या सहकात्यांनी केली.
  • 1963 मध्ये थुंबा इक्विटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन -TERLS हे केंद्र त्रिवेंद्रमला स्थापन झाले.
  • Nike Apache - M100 या भारताच्या पहिल्या रॉकेटचे उड्डाण थुंबा येथून करण्यात आले.


डॉक्टर साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली 1969 मध्ये INCOSPAR ची पुनर्रचना करून ISRO इस्रो (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) ची स्थापना बेंगलोर येथे करण्यात आले.

  • 1972 मध्ये अंतराळ आयोग आणि अंतराळ विभाग यांची स्थापना करण्यात आली.
  • 1972 मध्ये थुंबा येथील पूर्ण संकुलाला विक्रम साराभाई स्पेस सेंटर असे नाव देण्यात आले.
  • अंतराळ आयोग ही देशातील अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन व विकास कार्यांच्या सुसूत्रीकरणासाठी सर्वोच्च संस्था म्हणून कार्य करते.

इस्रो चे  अध्यक्ष -  एस. सोमनाथ 

  • देशातील अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान कार्यांचे नियोजन व व्यवस्थापन इस्रो मार्फत केले जाते.
  • त्यांची अंमलबजावणी इस्रोच्या विविध अंतराळ केंद्रांमार्फत केली जाते.

इस्रोचे अंतराळ केंद्रे खालील प्रमाणे.

1)विक्रम साराभाई स्पेस सेंटर

  1. तिरुअनंतपुरम जवळील थुंबा  या ठिकाणी हे केंद्र आहे.
  2. थुंबा या ठिकाणाचे निवड करण्यामागील कारण म्हणजे हे ठिकाण पृथ्वीच्या चुंबकीय विषववृत्तावर वसलेले आहे.
  3. इस्रोचे हे सर्वात मोठे केंद्र आहे.
  4. SLV,. ASLV, PSLV, GSLV या उड्डाण वाहनांच्या निर्मितीमध्ये व विकासाचे ते प्रमुख केंद्र आहे.

2) इस्रो सॅटॅलाइट सेंटर

  1. हे केंद्र बंगलोर येथे आहे.
  2. येथे उपग्रह यंत्रणेचा आराखडा निर्मिती चाचणी व व्यवस्थापन केले जाते.
  3. सध्या IRS व INSAT या प्रकारच्या उपग्रहांची बांधणी या केंद्रामध्ये केली जाते.

3) SHAR केंद्र [ सतीश धवन स्पेस सेंटर ]

  1. हे इस्रोचे प्रमुख उड्डाण केंद्र आहे.
  2. हे केंद्र आंध्रप्रदेशाच्या पूर्व किनाऱ्याजवळ श्रीहरीकोटा येथे आहे.
  3. SHAR म्हणजे Shriharikota High Altitude Range होय.
  4. या केंद्राचे नाव बदलून सतीश धवन स्पेस सेंटर असे करण्यात आले आहे.
  5. भारतातून अवकाशात सोडण्यात येणाऱ्या सर्व उपग्रहांचे उड्डाण येथून करण्यात येते.

4) स्पेस ॲप्लीकेशन सेंटर - SAC

  1. हे केंद्र अहमदाबाद येथे असून ते इस्रोचे प्रमुख संशोधन व विकास केंद्र आहे.
  2. येथे अंतराळ तंत्रज्ञानाच्या व्यवहारिक उपयोगितेच्या बाबींचे संशोधन संघटन व निर्मिती केली जाते.

5) नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी - NRSA

  1. ही अंतराळ खाते म्हणजेच DOS च्या अंतर्गत येणारी स्वायत्त संस्था आहे.
  2. ही संस्था हैदराबाद या ठिकाणी आहे.
  3. उपग्रहांनी पृथ्वीवरील संसाधनांबाबत पाठविलेल्या माहितीचे पाहणी ओळख वर्गीकरण करण्याच्या सोयी सुविधा येथे निर्माण करण्यात आले आहेत.
  4. NRSA मार्फत देहराडूनला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेंसिंग हे केंद्र चालवले जाते.

6) मास्टर कंट्रोल फॅसिलिटी MCF

हसन (कर्नाटक) येथे असलेली ही संस्था इन्सॅट उपग्रहांच्या उड्डाणानंतरच्या सर्व घडामोडींचे नियंत्रण करण्याची संबंधित आहे.

7) लिक्विड प्रोपलेशन सिस्टीम सेंटर

इस्रोच्या उड्डाण वाहन व उपग्रहांसाठी लागणाऱ्या द्रवरूप प्रक्षेपण व्यवस्थेचे संशोधन विकास व चाचण्या तिरूअनंतपुरम,बेंगलोर व महेंद्रगिरी (तामिळनाडू) या ठिकाणी केल्या जातात.

चंद्रयान मोहीम

  • २२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान-२ मोहीम ६ सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर अंशतः अयशस्वी झाली होती. 
  • मात्र त्यानंतर इस्रो नियोजित चंद्रयान-३ मोहीम हाती घेतली होती. चंद्रयान-३ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २:३५ वाजता झाले.
  • चांद्रयान-3 चे प्रक्षेपण 14 जुलै 2023 रोजी, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:35 वाजता श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश, भारत येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले. 
  • चंद्रावर पोहोचण्यासाठी लागणार्‍या मार्गात हे यान प्रभावीपणे ठेवण्यात आले आहे.
  •  पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर अंदाजे 384,400 किलोमीटर आहे. 
  • असा अंदाज आहे की चांद्रयान-3 मिशन 23 ऑगस्ट किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशावर सॉफ्ट लँडिंग करेल.
  • चंद्रयान 3 च्या प्रक्षेपणासाठी जुलै महिन्याची निवड करणे ही एक विशेष हालचाल होती कारण इस्रोने पृथ्वी आणि चंद्राच्या जवळ येण्याबाबत केलेल्या गणनामुळे. 

चांद्रयान मोहीम 1, 2 आणि 3 सविस्तर माहिती अभ्यासा.