- खालील सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचून त्यांच्या उत्तरासाठी खाली दिलेले मुद्दे सविस्तर अभ्यासा.
- सर्व संकल्पना व्यवस्थित स्पष्ट होण्यासाठी खाली प्रश्न समजून घेऊन त्यांचे उत्तरे वहीत लिहून काढा. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी हे खूप महत्त्वाची बाब ठरेल.
- अदिश राशी म्हणजे काय?
- पुरण कशास म्हटले जाते?
- त्वरण ऋण असू शकते का?
- सदिश राशी म्हणजे काय?
- एखाद्या वस्तूचा वेग वाढला तर कोणत्या प्रकारचे तोरण निर्माण होऊ शकते?
- गती सरळ रेषेत असेल तर वेग आणि चाल यांची मूल्य कशी असतात?
- चाल आणि वेग यांची एकक कोणती?
- वेग म्हणजे काय?
- अंतर ही कोणती राशी आहे?
- शिवण यंत्राची सुई, झोका यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची गती असते?
- फुलपाखराचे उडणे फुटबॉल चा खेळ यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची गती असते?
- घुर्नन गती म्हणजे काय?
- पंखा भवरा पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे यामध्ये कोणत्या प्रकारची गती असते?
- आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला कोणती गती असे म्हणतात?
- रेषीय एकसमान गती म्हणजे काय?
- गती म्हणजे काय?
- जर एखादी वस्तू सरळ रेषेत स्वतःची जागा बदलत असेल तर त्या गतीला कोणती गती म्हणतात?
गती, त्वरण, विस्थापन आणि चाल [ Speed, acceleration, displacement and gait ]
गती - Speed
वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला वस्तूची गती म्हणतात.
गतीचे प्रकार 1) स्थानांतरणीय गती जर एखादी वस्तू सरळ रेषेत किंवा थोडेफार वक्रकार स्वतःची जागा बदलत असेल तर त्या गतीला स्थानांतरणीय गती म्हणतात.
1) रेषीय गती
एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्याला रेषीय गती असे म्हणतात.
उदा. रेल्वेची गती, वरून सोडलेला चेंडू खाली येणे.
रेषीय गतीचे दोन प्रमुख प्रकार आहेत.
A. रेषीय एकसमान गती
एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हणतात.
B. रेषीय असमान गती
एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेल्या अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गती रेषीय असमान गती म्हणतात.
2) नैकरेषीय गती
एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैकरेषीय गती म्हणतात.
3] आंदोलित गती
आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती म्हणतात.
उदाहरणात झोपाळा.
४] वर्तुळाकार गती / घुर्णन गती
- ज्यावेळी एखाद्या वस्तूची गतीही एका विशिष्ट असाभोवती असेल तर त्या गतीला घुर्णन गती असे म्हणतात. उदा. पंखा, भवरा, पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे.
- वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात.
5) दोलन गती ज्या वस्तूची गती पुन्हा पुन्हा एकाच मार्गाने होत असेल तर त्या गतीस दोलन गती म्हणतात. उदा. शिवण यंत्राची सुई, झोका.
नियतकालिक गती
ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती म्हणतात.
यादृच्छिक गती
ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.
उदा. फुलपाखराचे उडणे, फुटबॉल चा खेळ, रांगणारे बाळ इ.
चाल
- एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. चाल = पार केलेले अंतर ÷ अंतर पार करण्यास लागणारा वेळ.
- एखाद्या वस्तूने एक काळात कापलेल्या अंतरास चाल असे म्हणतात एक विशिष्ट अंतर पार करण्यास किती वेळ लागेल हे त्या वस्तूच्या चालीवर अवलंबून असते.
- विस्थापन
- एका विशिष्ट दिशेने सरळ रेषेत कापलेल्या कमीत कमी अंतरास विस्थापन असे म्हणतात.
- एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय.
- वस्तू स्थिर झाल्यानंतर आरंभबिंदू व अंतिम बिंदू यांच्यातील कमीत कमी सरळ रेषेतील अंतर म्हणजे विस्थापन होय. विस्थापन हे अंतरापेक्षा जास्त असू शकत नाही परंतु अंतर हे विस्थापनापेक्षा जास्त असू शकते.
- एखाद्या गतिमान वस्तूने देशाचा विचार न करता प्रत्येक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय.
- अंतर म्हणजे गतिमान वस्तू मधील आरंभबिंदू व अंतिम बिंदू यांच्यातील प्रत्यक्ष मार्गक्रमण होय.
- अंतर ही अदिश राशी आहे. वेग
- वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर होय. वेग = विस्थापण ÷ विस्थपनाला लागलेला वेळ. चाल किंवा वेगाचे एकक हे मीटर/ सेकंद आहे.
- वेग = विस्थापण ÷ विस्थपनाला लागलेला वेळ. चाल किंवा वेगाचे एकक हे मीटर/ सेकंद आहे.
- .एखाद्या वस्तूचा वेग आणि काळ यांचा संबंध म्हणजे त्वरन होय.
- जर एखाद्या वस्तूची चाल ही स्थिर असेल तर त्या वस्तूचे त्वरण 0 असते.
- त्वरण ऋण धन व शून्य असू शकते.
- वेग वाढला तर धनत्वरण, वेग कमी झाला तर ऋण त्वरण वेगात बदल नाही झाला तर शून्य त्वरण.
- अदिश राशि जी राशी फक्त परिमाणाच्या सहाय्याने दर्शविता येते त्याला अदिश राशि म्हणतात. अदिश राशीला दिशा नसते. उदा. अंतर चाल वस्तुमान आकार गणता वेळ इ. २ सदिश राशी जी राशी दर्शविण्यासाठी परिणाम व दिशा हे दोन्हीही लागतात त्या राशीला सदिश राशी म्हणतात. सतीश राशी दर्शविताना डोक्यावर बान काढतात. उदा त्वरण वेग विस्थापन बल.