पेशी व पेशीअंगके सविस्तर माहिती - Detailed information about cells and organelles
- खालील सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचून त्यांच्या उत्तरासाठी खाली दिलेले मुद्दे सविस्तर अभ्यासा.
- सर्व संकल्पना व्यवस्थित स्पष्ट होण्यासाठी खाली प्रश्न समजून घेऊन त्यांचे उत्तरे वहीत लिहून काढा. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी हे खूप महत्त्वाची बाब ठरेल.
- पेशीतील स्त्रावी अंगक कोणते?
- पेशी मध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था कोणती?
- पेशीवर हल्ला करणाऱ्या जिवाणू विषाणू यासारख्या सूक्ष्म जीवांना मारण्याचे काम कोण करते?
- उपासमारीच्या काळात पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे पाचन कोण करते?
- लवकांचे किती प्रकार असतात?
- सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशी मधूनच होतो असे कोणी स्पष्ट केले?
- सर्व सजीव पेशीपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे असा सिद्धांत कोणी मांडला?
- पेशीच्या अवयवांना काय म्हणतात?
- प्राणी पेशी मध्ये पेशीभित्तिका असते का?
- पेशीभित्तिकांचे कार्य काय आहे?
- पेशीभित्तिका या कशापासून बनलेले असतात?
- मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असा उल्लेख कशाचा केला जातो?
- पेशी द्रवात कोणते घटक साठवलेले असतात?
- केंद्रकाचे कार्य काय आहे?
- सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक मूलभूत घटक कोणता?
- कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला?
- एक मायक्रोमीटर बरोबर किती नॅनोमीटर?
- सर्व पेशींचा आकार कशाशी निगडित असतो?
- पेशीच्या आत मध्ये विविध पदार्थाचे वहन करणाऱ्या अंगकाला काय म्हणतात?
- लय कार्यक्रम म्हणजे काय?
- पेशीवर हल्ला करणाऱ्या जिवाणू विषाणूंना मारण्याचे काम कोण करते?
- पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम कोणाचे असते?
- पेशीतील स्थायू व द्रव पदार्थाची साठवणूक करणारे कोश यांना काय म्हणतात?
- ज्या पेशीची अंगके पटल वेस्टीज असतात त्यांना कोणत्या पेशी म्हणतात?
पेशी
- पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे.
- रॉबर्ट हूक या शास्त्रज्ञाने 1665 मध्ये पेशीचा शोध लावला.
- लॅटिन भाषेत सेला असे म्हणतात, सेला म्हणजे लहान खोली.
1838 मध्ये श्लायडेन व थिओडोर श्वान या शास्त्रज्ञांनी एक सिद्धांत मांडला -
- सर्व सजीव पेशीपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे.
1885 आर.विरशॉ -
सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशी मधूनच होतो असे स्पष्ट केले.
- पेशींच्या आकारमानाचे मोजमाप मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांचा वापर करून केले जाते.
- पेशी निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो.
- 1 मायक्रोमीटर = 1000 नॅनोमीटर.
पेशींचा आकार
- सर्व सजीवांच्या पेशीच्या आकारात विविधता असते.
- त्यांचा आकार प्रामुख्याने कार्याशी निगडित असतो.
- गोलाकार, दंडाकार, स्तंभाकार, सरपिलाकार,अंडाकृती, आयताकार अशा विविध आकारांच्या पेशी असतात.
- विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे पेशी अंगके होय.
- ही अंगके म्हणजे पेशीचे अवयव आहेत.
- प्रत्येक अंगकाभोवती मेदप्रथिनियुक्त पटल असते.
- केंद्रक व हरितलवक यांच्या व्यतिरिक्त सर्व अंगके ही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने पाहता येतात.
1] पेशीभित्तीका
- प्राणी पेशी मध्ये पेशीभित्तिका नसते.
- पेशिभित्तिका म्हणजे पेशी पटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण.
- पेशीभित्तिका सेल्युलोज व पेक्टीन या कर्बोदकापासून बनलेली असते.
- पेशीला आधार देणे, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे हे पेशीभित्तिकीचे कार्य आहेत.
2] प्रद्रव्यपटल / पेशीपटल
- पेशी भोवती असणारे पातळ नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते.
- प्रद्रव्यपटल काही ठराविक पदार्थांना ये जा करू देते तर काही पदार्थांना अटकाव करते म्हणून त्याला निवडक्षम पारपटल म्हणतात.
- पेशी बाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रद्रव्य पटेल करते यास समस्तीती म्हणतात.
- मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असा उल्लेख पेशीपटल चा केला जातो
3) पेशीद्रव्य
- प्रद्रव्यपटल व केंद्रक यामधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात.
- पेशीद्रव्य हा चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करीत असतो.
- त्यात अनेक पेशी अंगके विखुरलेली असतात.
- पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशी द्रव्य हे माध्यम आहे.
- पेशी अंग काव्यतिरिक्त असलेला पेशीतील भाग म्हणजे पेशीद्रव्य.
- पेशी द्रवात अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्वे साठवलेली असतात.
4) केंद्रक
- केंद्रक पेशीच्या मध्यभागी असते.
- पेशी विभाजनात महत्त्वाची भूमिका बजावते.
- पेशीच्या सर्व क्रियांचे नियंत्रण ठेवते.
- पेशीला परिपक्वता आल्यानंतर तिचे कार्य केंद्रक निश्चित करते.
केंद्रकाचे कार्य
- पेशीच्या सर्व चयापचावर नियंत्रण ठेवणे.
- पेशी विभाजन करणे.
- अनुवंशिक गुणांची संक्रमण करणे.
5) अंतर्द्रव्यजालिका
पेशीच्या आत मध्ये विविध पदार्थाचे वहन करणाऱ्या अंगकाला अंतर्द्रव्यजालिका म्हणतात.
अंतर्द्रव्यजालिका कार्य
- पेशीला आधार देणे.
- प्रथिन व मेदांचे संश्लेषण व वहन.
- विषारी पदार्थ पेशी बाहेर टाकने.
6) गॉल्गीकाय.
- कामिलो गॉलगी जर्मन शास्त्रज्ञाने सर्वात प्रथम गोलगी काय अंगकाचे वर्णन केले.
- या कोषांना कुंडे म्हणतात यामध्ये विविध विकरे असतात.
- पेशीचा रासायनिक कारखाना असे गोलगीकायचे वर्णन केले जाते.
गॉल्गीकाय चे कार्य -
- गॉल्गीकाय हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे.
- पेशीत संश्लेषित झालेल्या विकरे प्रथिने वर्णके इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडवून त्यांची विभागणी करणे त्यांना पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचविणे.
- रिक्तिका व स्त्रावी पिटिका यांची निर्मिती करणे.
- पेशीभीतीका, प्रद्रव्यपटल व लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करणे.
7] लयकारिका
पेशीत घटणाऱ्या चे अपचे क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लयकारीका.
लयकारीका हे साधे एक पटलाने वेस्टीत कोश असून त्यामध्ये पाचक विकरे असतात.
लयकारीकाचे कार्य
- पेशीवर हल्ला करणाऱ्या जिवाणू विषाणू सारख्या विषारी सूक्ष्मजीवांना मारण्याचे काम लयकारी करतात.
- स्वतःच्या शरीराच्या जीर्ण व कमजोर पेशी अंगकांना बाहेर फेकण्याचे काम लय कार्य करतात यालाच स्वयंलय म्हणतात,म्हणून लयकरिकाना उध्वस्त करणारे पथक म्हणतात.
- जीर्ण पेशींना स्वतःच्याच विकरांनी मारण्याचे काम लय कार्यकारी करतात म्हणून यांना आत्मघाती पिशव्या म्हणतात.
- उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे पाचन करते.
8] तंतुकणिका -
- प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम तंतुकणिका करतात.
- तंतूकनिकेचे आतील आवरण सच्छिद्र तर आतील आवरण घड्यांनी बनलेले असते.
- तंतुकणिका पेशींचे ऊर्जा घर म्हटले जाते.
- लोहित रक्तपेशीमध्ये तंतुकणिका नसतात परिणामी या पेशी ऑक्सिजनचे वहन करीत असल्या तरीही स्वतः त्यातील ऑक्सिजन वापरत नाहीत.
- तंतुकणिकांना ऑक्सीशोषणाचे कार्यात्मक व रचनात्मक घटक म्हणून ओळखले जाते.
९] लवके
- लवके द्वीपटल युक्त असतात आणि केवळ वनस्पती पेशीत आढळतात.
लवके दोन प्रकारचे असतात.
१] वर्णलवके
२] अवर्णलवके
लवके यांची कार्य
- सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रुपांतर करणे.
- फळे व फुलांना रंग प्राप्त करणे.
- पिष्टमय पदार्थ मेद व प्रथिनांचे संश्लेषण व साठा.
१०] रिक्तीका
- पेशीतील स्थायू व द्रव पदार्थांची साठवणूक करणारे कोश म्हणजे रिक्तिका होय.
- प्राण्यांमध्ये कमी आकाराच्या तर वनस्पतीत जास्त आकाराचे रिक्तिका असतात.
रिक्तीकांचे कार्य
- पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे.
- ग्लायकोजेन प्रथिने व पाण्याचे संचय करणे.
पेशींचे मुख्य दोन प्रकार आहेत
१] दृश्यकेंद्रकी पेशी
ज्या पेशींची अंगके पटल वेष्टीत असतात त्यांना दृश्यकेंद्रकी पेशी म्हणतात.
- आकार - 5-100 मायक्रोमीटर.
- गुणसूत्र संख्या - एकापेक्षा जास्त.
- केंद्रक - केंद्रकपटल, केंद्रकी व केंद्रकद्रव्य असलेले सुस्पष्ट केंद्रक असते.
- तंतूकणिका, लवके - असतात.
- उदाहरणे - उच्चविकसित एकपेशीय व बहुपेशीय वनस्पती व प्राणी यांमध्ये आढळतात.
२] आदिकेंद्रकी पेशी
- यामध्ये अंगका भोवती आवरणे नसतात.
वैशिष्ट्ये
- अत्यंत साध्या पेशी म्हणजेच संपूर्ण विकसित केंद्र नसते.
- यांच्यात एकच गुणसूत्र असते.
- DNA यांचा थेट पेशीद्रव्येशी संबंध येतो.
- 1-10 मायक्रोमीटर
- आवरणयुक्त अंगके नसतात.
- जीवाणू