आपली आकाशगंगा, सूर्यमाला, ग्रह, उपग्रह सविस्तर माहिती - Detailed information about our galaxy, solar system, planets, Sub planets
- आपल्या आकाशगंगेला मंदाकिनी या नावाने ओळखले जाते.
- असंख्य तारे व त्यांच्या ग्रह मालिका यांच्या समूहास दीर्घिका म्हणतात.
- आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात.
- आपली आकाशगंगा ज्या दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दीर्घिकासमूह म्हणतात.
- विश्वात अशा अनेक दीर्घिका आहेत.
- आपल्या आकाशगंगेच्या जवळ असलेली दुसरी दीर्घिका देवयानी या नावाने ओळखली जाते.
- एडमिन हबल या वैज्ञानिकाने आपल्या आकाशगंगेच्या बाहेर इतर अनेक दीर्घिका असल्याचे स्पष्ट केले.
- नासा या अमेरिकन संस्थेने 1990 मध्ये हबल ही दुर्बीण पृथ्वीच्या कक्षेत सोडली.
- ताऱ्यांचा शोध घेणे, प्रकाश चित्रे घेणे व वर्णपट मिळवण्याचे काम त्यामुळे सोपे झाले.
- सूर्यमाला
- सूर्यमाले सूर्य ग्रह लघुग्रह उल्का यांचा समावेश होतो.
सूर्य
- सूर्यमालेचा केंद्रस्थानी असलेला सूर्य पिवळ्या रंगाचा तारा आहे.
- सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6000 अंश सेल्सिअस आहे.
- सूर्य इतका मोठा आहे की त्यामध्ये पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह सामावू शकतात.
- सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळेच सूर्यमालेतील खगोलीय वस्तू त्याच्याभोवती फिरतात.
- सूर्याचा व्यास साधारणतः 13 लाख 92 हजार किलोमीटर एवढा आहे.
सूर्यमालेतील ग्रह [सूर्यापासून अंतराच्या क्रमाने ] - planets in the solar system
1] बुध - Mercury
- सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे बुध आहे.
- बुध हा सर्वात लहान ग्रह आहे.
- सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतो.
- हा सर्वात वेगवान ग्रह आहे.
- या ग्रहास एकही उपग्रह नाही.
- हा सर्वात उष्ण ग्रह आहे.
- या ग्रहाला उपग्रह नाही.
- बुध या ग्रहाचा परिवलन काळ 58.65 दिवस तर परिभ्रमण काळ 88 दिवस आहे.
- बुध या ग्रहावर वातावरण नाही.
2] शुक्र - Venus
- सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे.
- या ग्रहास पहाटतारा असेही म्हणतात.
- हा पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह आहे.
- सामान्यतः सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस हा ग्रह दिसतो.
- शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
- शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे.
- आपल्या चंद्राच्या जशा कला असतात तशा शुक्राच्या देखील कला असतात.
- शुक्राला उपग्रह नाही.
- शुक्राचा परिवलन काळ 243 दिवस असून परिभ्रमण काल 225 दिवस इतका आहे.
- शुक्रावर वातावरण नाही.
3] पृथ्वी - The Earth
- सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी आहे.
- पृथ्वी शिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही.
- पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे.
- या चुंबकीय क्षेत्रामुळेच सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात.
- पृथ्वीला एक उपग्रह आहे.
- पृथ्वीचा परिवलन काळ 24 तास तर परिभ्रमण काळ 365 दिवस आहे.
- पृथ्वीचे स्वतःभोवती परिवलन ज्या अक्षाभोवती होते तो परिभ्रमण कक्षेला लंब नसून थोडा कललेला आहे त्यामुळेच पृथ्वीवर हिवाळा उन्हाळा हे ऋतू आढळतात.
- पृथ्वी हा सर्वाधिक घनतेचा ग्रह आहे.
4] मंगळ - Mars
- हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे.
- मंगळावरील मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो म्हणून त्याला लालग्रह असेही म्हणतात.
- मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिंपस मोंन्स आहे.
- मंगळ या ग्रहाला दोन उपग्रह आहेत. [ 1. PHOBOS 2. DEIMOS ]
- मंगळ ग्रहाचा परिवलन काळ 24 तास 37 मिनिटे तर परिभ्रमण काळ 1.88 वर्ष इतका आहे.
- मंगळावर वातावरण नाही.
5] गुरु Jupiter
- गुरु हा सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह आहे.
- गुरु मध्ये सुमारे १३९७ पृथ्वीगोल सहज मावतील इतका तो मोठा आहे.
- हा सर्वात जड ग्रह आहे.
- गुरु स्वतःभोवती फार वेगाने फिरतो.
- गुरु ग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असल्याने त्यास वादळी ग्रह असेही म्हणतात.
- गुरुला ज्ञात 64 उपग्रह आहेत, परंतु दुर्बिणीतून फक्त ४ उपग्रह पाहू शकतो.
- गुरुचा परिवलन काळ 9 तास 56 मिनिटे इतका असून परिभ्रमण काळ 11.87 वर्ष इतका आहे.
- गुरु ग्रहावर वातावरण आहे तसेच गुरुला कडी आहे.
6] शनि - Saturn.
- गुरुग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह आहे.
- शनि या ग्रहाभोवती कडी आहे.
- हा उघड्या डोळ्यांना दिसू शकणारा सर्वात लांबचा ग्रह आहे.
- त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे.
- शनी जर एखाद्या मोठ्या समुद्रात टाकला तर तो चक्क तरंगू शकेल.
- या ग्रहाला 33 ज्ञात उपग्रह आहे.
- शनीचा उपग्रह टायटन हा सर्व उपग्रहात मोठा उपग्रह आहे.
- शनी या ग्रहाचा परिवलन का 10 तास 40 मिनिटे तर परिभ्रमण काळ 29 वर्ष इतका आहे.
- शनि या ग्रहाला वातावरण आहे.
7] युरेनस
- युरेनस सूर्यमालेतील सातवा ग्रह असून या ग्रहाला दुर्बिणी शिवाय पाहता येत नाही.
- युरेनस ग्रहाचा आस खूप कललेला असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो.
- युरेनस या ग्रहाला 27 ज्ञात उपग्रह आहे.
- याचा परिवलन काळ 17 तास 24 मिनिटे असून परिभ्रमण काळ 84 वर्ष आहे.
- युरेनस वर वातावरण आहे.
- शुक्रप्रमाणे पूर्वेकडून पास्चुमिकडे फिरतो.
8] नेपच्यून
- नेपच्यून हा सूर्यमालेतील आठवा ग्रह आहे.
- नेपच्यून वर एक ऋतू सुमारे 41 वर्षाचा असतो.
- या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात.
- नेपच्यून या ग्रहाला तेरा ज्ञात उपग्रह आहेत.
- याचा परिवलन काळ 16 तास 11 मिनिटे तर परिभ्रमण काळ 164 वर्षे इतका आहे.
- बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत तर गुरु,शनी, युरेनस व नेपच्यून हे सर्व बहिर्ग्रह आहेत.
- सर्व बहिर्ग्रहाणभोवती कडे आहेत.
- सर्व बहिरग्रहांचे बाह्य आवरण हे वायुरूप असते.
उपग्रह - Sub planet
- सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह म्हणतात.
- ग्रहांसारखे उपग्रह हे सुद्धा स्वतःच्या अक्षावर स्वतःभोवती फिरतात.
- चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून त्याच्यावर वातावरण नाही.
- बुध व शुक्र हे दोन ग्रह सोडताले इतर सर्व ग्रहांना उपग्रह आहेत.
- चंद्राचा परिभ्रमण काळ आणि परिवलन काळ 27.3 दिवस आहे.
- उपग्रहांपैकी टायटन हा सर्वात मोठा उपग्रह आहे.
लघुग्रह - Asteroid
- सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान लहान खडकांना लघुग्रह म्हणतात.
- मंग आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान खगोलीय वस्तूंचा पट्टा निर्माण झाला आहे.
- सर्व लघुग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात.
बटुग्रह dwarf planet
- सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लहान आकाराची खगोलीय वस्तू म्हणजे बटुग्रह होय.
- प्लुटो हा अगोदर ग्रह होता परंतु याचा ग्रहाचा दर्जा काढून त्याला बटुग्रहात समावेश केला आहे.
- आंतरराष्ट्रीय खगोल समितीने केलेल्या परिभ्रमण कक्षेच्या नियमात प्लुटोचे परिभ्रमण ग्राह्य नसल्याने त्याला आता ग्रह मानले जात नाही.
- प्लुटोला सूर्याभोवती फेरी मारण्यास 248 वर्ष लागतात तर परिवलनास 6.38 दिवस लागतात.
धूमकेतू comet
- धूमकेतू म्हणजे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे अशनी गोल होय,
- धूमकेतू हे धूळ व बर्फ यांच्यापासून तयार झालेले असून आपल्या सूर्यमालेचा एक घटक आहे.
- धूमकेतू गोठलेल्या द्रव्यांनी व धुलीकणाने बनलेले असतात.
- सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्यांचे वायूत रूपांतर होते.
- हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेस फेकले जातात.
- त्यामुळे काही धूमकेतून लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात.
- धूमकेतू सूर्याभोवती फिरतात.
धूमकेतूनचे मुख्य दोन प्रकार आहेत -
- दीर्घ मुदतीचे धूमकेतू : या धूमकेतून ना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो.
- अल्पमुदतीचे धूमकेतू : या धूमकेतून ना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षापेक्षा कमी कालावधी लागतो.
- हलेचा धूमकेतूचे १९१०, १९८६ साली पुनरागमन झाले होते.
- तो आता 2062 साली दिसण्याची अपेक्षा आहे.
- हलेचा धूमकेतूचा केंद्रभाग 16 किलोमीटर लांब व 7.5 किलोमीटर रुंद आढळून आला हलेचा धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 76 वर्षे लागतात.
- फ्रेड व्हिपल या खगोल निरीक्षकांनी धूमकेतूची रचना विविध घटकांच्या बर्फाळ समुच्चयाने बनलेली असावी असे प्रतिपादन केले.
- 1950 पर्यंत त्यांनी सहा धूमकेतू शोधून काढले होते.
- या माहितीवर आधारित धूमकेतूचे डर्टी स्नोबॉल असे नामकरण झाले.
उल्का
- कधी कधी आकाशातून एखादा तारा तुटून पडल्यासारखा दिसतो या घटनेला उल्कापात म्हणतात.
- अनेक वेळा या उल्का म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात.
- मात्र जे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात त्यांना उल्का म्हणतात.
- काही वेळेस उल्का पूर्णतः न जळतात पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना अशनी असे म्हणतात.
- महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अशनी आघाताने तयार झाले आहे.
- पृथ्वीप्रमाणेच इतर खगोलीय वस्तूंवर देखील उल्कापात आणि अशनीपात होतात.
ध्रुवतारा
- ध्रुवतारा फक्त उत्तर गोलार्धातूनच दिसतो.
- तो उत्तर दिशा दर्शवितो.
- हा सूर्यमालेतून दिसणारा सर्वात महत्त्वाचा तारा आहे.
- ध्रुवतारा विश्वात स्थिर दिसतो.