मूलद्रव्ये, संयुगे व मिश्रने सविस्तर माहिती

मूलद्रव्ये, संयुगे व मिश्रने सविस्तर माहिती Detailed information on elements, compounds and mixtures   


दार्थांचे अवस्थांतर - Transition of substances

  •  पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो त्या क्रियेस पदार्थांचे अवस्थांतर असे म्हणतात.
  •  स्थायू,द्रव आणि वायू या पदार्थाच्या एकूण तीन अवस्था आहेत.
  •  एकोणिसाव्या शतकात जे विलार्ड गिफ्ट या शास्त्रज्ञाने पदार्थांची वैशिष्ट्ये ही त्यांच्या अवस्थांवर आणि कणांच्या  संरचनेवर अवलंबून असतात हे दाखवून दिले.
  •  वस्तू ज्यापासून तयार होते त्यास सर्वसाधारणपणे पदार्थ असे म्हणतात तसेच पदार्थाला द्रव्य म्हणून सुद्धा संबोधले जाते.

 पदार्थ / द्रव्याचे वर्गीकरण - Classification of substance / liquid

भौतिक वर्गीकरण - Physical classification

  1. स्थायू
  2. द्रव
  3. वायू 

रासायनिक वर्गीकरण -Chemical classification

  1. मूलद्रव्ये 
  2.  संयुगे 
  3.  मिश्रणे 

  1. मूलद्रव्ये - Elements -

  • मूलद्रव्ये हि संज्ञा सर्वप्रथम रॉबर्त बोईल यांनी मांडली.
  • पदार्थाचे लहान कण म्हणजे रेणू ज्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अनु असतात त्या पदार्थांना मूलद्रव्ये  म्हणतात. 
  • मूलद्रव्याचे लहानात लहान कण हे एकाच प्रकारच्या अणूंचे बनलेले असतात,
  •  प्रत्येक मूलद्रव्यातील अणूंचे वस्तुमान व आकारमान वेगवेगळे असते. आतापर्यंत शास्त्रज्ञांनी 119 मूलद्रव्यांचा शोध लावला आहे.
  •  त्यापैकी 92 मूलद्रव्ये ही निसर्गात आढळतात तर उर्वरित मूलद्रव्य ही मानवनिर्मित आहेत.
  •  डेमोक्रिटस ने मूलद्रव्याच्या लहान कणांना अणू असे नाव दिले.
  •  जॉन डाल्टन यांनी 1803 मध्ये अणू निर्माण करता येत नाहीत त्यांचे लहान कणांमध्ये विभाजन करता येत नाही व ते नष्टही करता येत नाहीत असा सिद्धांत मांडला.
  •  मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची पद्धत बरझेलियस या शास्त्रज्ञाने सुरू केली.
  • आपल्या घरामध्ये असणाऱ्या विद्युत दिव्यामध्ये जी तार  दिसते ती टंगस्टन या मूलद्रव्याची असते.
  •  मूलद्रव्य ही स्थायू द्रव किंवा वायू या अवस्थेत आढळतात.
  • धातूंमध्ये एक किंवा अधिक मूलद्रव्य मिसळून मूळ धातूंचे गुणधर्म बदलता येतात धातूंच्या या मिश्रणास संमिश्र असे म्हणतात.
  •  पितळ, पोलाद, सोने ही काही संमिश्र आहेत.

मूलद्रव्याचे वर्गीकरण - Classification of elements

१] धातू   

  • मूलद्रव्यापैकी निसर्गात एकूण 70 मूलद्रव्य हे धातू आहेत.
  • धातू हे स्थायू अवस्थेत आढळतात. अपवाद - पारा
  • काठीन्य, वर्धनीयता, चकाकी,  तन्यता, उष्णता व वीज सुवाहक हे धातूंची गुणधर्म असतात.

२] अधातू 

  •  22 मूलद्रव्य हे अधातू आहेत.
  • अधातू हे विजेची दुर्वाहक न चकाकणारे ठिसूळ असतात.
  • अधातू स्थायू द्रव व वायू असू शकतात.

३] धातुसदृश 

  • धातू व अधातू यांचे मिश्र गुणधर्म आढळतात.
  • उदा. बोरान, सिलिकॉन, अर्सेनिक, सेलेनियम इ.

२] संयुगे - 

  • दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुगे  होय.
  • रेणूमधील अणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग असतो.
  •  पाणी हे संयुग आहे.
  •  हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा एक अनु मिळून पाण्याचा एक रेणू तयार होतो.
  •  संयुगाच्या रेणूमध्ये दोन किंवा अधिक मूलद्रव्यांचे अनु रासायनिक संयोगातून एकत्र आलेले असतात म्हणून संयुगाचा निर्देश करण्यासाठी रेणुसूत्राचा वापर करतात.
  • संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व अणूंची संख्या यांच्या साह्याने संयुगाचे केलेले लेखन म्हणजे रेणुसूत्र होय.

 ३] मिश्रण

  • वेगवेगळी मूलद्रव्ये किंवा संयुगे एकमेकांमध्ये मिसळली की मिश्रण तयार होते.

मिश्रणातील घटक वेगळे करण्याच्या काही पद्धती.

 १] उर्ध्वपतन पद्धत 

अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो.

 २]विलगीकरण पद्धत

 मिश्रणातील दोन द्रव वेगळे करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो.

३] अपकेंद्री पद्धत

 द्रव अणि स्थायू च्या मिश्रणातून स्थायू वेगळे  करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो.

४] रंजक द्रव्य पृथकरण पद्धत

  •  एकाच द्रावणात दोन किंवा अधिक पदार्थ अल्प प्रमाणात विरघळलेले असतील तर या पद्धतीचा उपयोग करून हे पदार्थ एकमेकांपासून वेगळे केले जातात.
  •  या पद्धतीचा उपयोग औषध निर्माण शास्त्रांमध्ये कारखान्यांमध्ये वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये तसेच मिश्रणातील घटक ओळखण्यासाठी व वेगळे करण्यासाठी केला जातो.

 मिश्रणाचे प्रकार 

  1.  समंगी  मिश्रण 
  2.  विषमांगी मिश्रण 

१] समांगी मिश्रण 

यात  घटक पदार्थ संपूर्ण मिश्रणात एकसारखे मिसळतात.

 समांगी मिश्रणास द्रावण असेही म्हणतात.

  द्रावक आणि द्राव्य या दोन घटकांनी द्रावण बनते.

२] विषमांगी मिश्रण 

विषमांगी मिश्रणातील घटक संपूर्ण मिश्रणात एकसारखे मिसळलेले नसतात.

 विषमांगी  मिश्रणाचे निलंबन व कलील असे दोन प्रकार पडतात.

१. निलंबन

ज्या मिश्रणात द्राव्याचे कण न मिसळता निलंबित राहतात आणि हे कण  आपण डोळ्यांनी पाहू शकतो त्याला निलंबन म्हणतात.

उदा. पाणी व रॉकेलचे मिश्रण, वाळू

२. कलील

  • ज्या मिश्रणात द्रव्याचे कण हे अतिशय लहान असतात व ते मिसळल्या सारखे वाटतात त्यालाच कलील म्हणतात.
  • यातील कण नुसते डोळ्यांनी दिसू शकत नाहीत.
  • जर आपण कलेल द्रावणात प्रकाश टाकला तर आपणास प्रकाशाचे अपस्करण होताना दिसेल यास टिंडाल परिणाम म्हणतात.
  • दूध शाई हे कलीलाचे उदाहरणे आहेत.