- खालील सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचून त्यांच्या उत्तरासाठी खाली दिलेले मुद्दे सविस्तर अभ्यासा.
- सर्व संकल्पना व्यवस्थित स्पष्ट होण्यासाठी खाली प्रश्न समजून घेऊन त्यांचे उत्तरे वहीत लिहून काढा. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी हे खूप महत्त्वाची बाब ठरेल.
- अक्षय सांगड्यामध्ये शरीरातील कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?
- हात पाय या हाडांचा समावेश कोणत्या प्रकारच्या सांगाड्यामध्ये होतो?
- कवटी मध्ये एकूण किती हाडे असतात?
- डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून काय?
- उरोस्थी हे हाड कोठे असते?
- छातीच्या पिंजऱ्यात किती हाडे असतात?
- मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जू चे संरक्षण कोण करते?
- ज्या हाडांची हालचाल होते त्याला कोणत्या प्रकारचे सांधे म्हणतात?
- कोणत्या सांध्यांची हालचाल 360 अंश कोणात होते?
- त्वचेचा कोणता भाग शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करतो?
- धर्म ग्रंथी म्हणजे काय?
- शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्याचे काम कोण करते?
- आपल्या शरीरातील केसांचा रंग कोणत्या घटकामुळे ठरतो?
- भुरे पांढरे केस हे कशामुळे तयार होतात?
- आपल्या तळ हातामध्ये एकूण किती हाडे असतात?
- आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणते?
- आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते?
आपली अस्थिसंस्था -Skeletal system
- अस्थी म्हणजे हाड.
- कधी कधी खेळताना पडल्यानंतर हाताचे किंवा पायाच्या हाड मोडते यालाच अस्थिभंग असे म्हणतात.
- अस्थिभंग झाल्यानंतर त्या भागाची क्ष किरण प्रतिमा काढली जाते.
- क्ष किरण प्रतिमेचा शोध रौंटजैन यांनी लावला आहे.
- शरीरातील सर्व हाडे व कूर्चा एकत्र मिळून अस्थिसंस्थेची रचना होते.
- हाडांची रचना मुख्यत्वे दोन घटकांनी बनलेले असते.
- अस्थिपेशी या जैविक असतात तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिज, क्षार यासारख्या अजैविक पदार्थापासून हाडे बनतात.
- कॅल्शियम मुळे हाडांना मजबूतपणा येतो.
- शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थिसंस्था म्हणतात.
- हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला Osteology म्हणतात.
- शरीराच्या वजनाच्या 18.1% हाडांचे वजन असते.
- लहान अर्बकामध्ये 350 हाडे असतात तर प्रौढ माणसात 206 हाडे असतात.
आपल्या शरीरातील हाडांचे आकारानुसार प्रामुख्याने चार प्रकार पडतात.
- चपटी हाडे.
- लहान हाडे.
- अनियमित हाडे.
- लांब हाडे.
मानवी अस्थिसंस्था ही दोन भागांमध्ये विभागली जाते.
- अक्षय सांगाडा.
- उपांग सांगाडा
- अक्षय सांगाडा -
- अक्षय सांगाड्यामध्ये कवटी, पाठीचा कणा व छातीच्या पिंजऱ्याचा समावेश होतो.
- ते सर्व शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेषेभोवती असतात.
- उपांग सांगाडा
- उपांग सांगाडा हा या मध्यरेषेच्या बाजूंच्या हाडांचा मिळून तयार झालेला असतो.
- यामध्ये हात पाय या हाडांचा समावेश होतो.
- अक्षीय सांगाडा
१] कवटी
- डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून कवटी बनते.
- यातील हाडे आकाराने सपाट व मजबूत असतात,
- डोक्यात 8 आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी एकूण 22 हाडे कवटीमध्ये असतात,
- कवटीमधील खालचा जबडा सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही.
२[ छातीचा पिंजरा
- छातीमधील पिंजऱ्यासारखी रचना असणाऱ्या भागाला छातीचा पिंजरा असे म्हणतात.
- छातीत एक उभे चपटे हाड असते त्याला उरोस्थी म्हणतात.
- त्याला आडव्या चपट्या बरगड्यांच्या बारा जोड्या जोडलेल्या असतात या 25 हाडांचा मिळून छातीचा पिंजरा तयार होतो.
- तो मागून पाठीच्या कन्याला जोडलेला असतो.
३] पाठीचा कणा
- कुलपासारखी आकाराची हाडे एकमेकांशी उभी सरळ जोडून पाठीचा कणा तयार होतो.
- पाठीच्या कण्यात एकूण 33 हाडे असतात.
- त्यातील प्रत्येकाला मनका म्हणतात.
- ही सर्व हाडे लवचिक असून एकावर एक अशी रचलेली असतात.
- पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जू चे संरक्षण करतो.
२] उपांग सांगाडा
१] हात व पाय
- हात व पायांच्या विविध भागांमध्ये अनेक हाडे असतात.
- ती एकमेकांना सांध्यांनी जोडलेली असतात.
२] सांधा
ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणी ला सांधा म्हणतात.
सांधे दोन प्रकारचे असतात.
१] चल साधा
हाडांची हालचाल होते याला चल सांधा म्हणतात.
उदा. हात पाय यातील हाडे.
२] अचल सांधा
हाडांची हालचाल होत नाही याला अचल सांधा म्हणतात.
उदा. कवटीची हाडे.
चल सांध्याचे प्रकार
१] बिजागिरीचा सांधा
- या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडांची हालचाल एकाच दिशेने शक्य होते.
- या सांध्यांची हालचाल 180 अंश कोनात होते.
- उदा. कोपर व गुडघा
२] उखळीचा सांधा
- या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडांची हालचाल दोन किंवा अधिक दिशांनी होते.
- या सांध्यांची हालचाल 360 अंश कोणात होते.
- उदा. खांदा,खुबा.
३] सरकता सांधा
या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडे फक्त एकमेकांवर सरकु शकतात.
उदा. मनगट, पायाचा घोटा या मधील सांधे.
त्वचा
- त्वचाही सर्व सजीवांच्या शरीराचा एक महत्त्वाचा व मोठा अवयव आहे.
- शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा म्हणतात.
- मानवी त्वचा ही मुख्यत्वे दोन थरांची बनलेले असते.
- सर्वात वरच्या थराला बाह्य त्वचा म्हणतात, तर त्याखाली थराला अंत त्वचा म्हणतात.
- त्याखाली रक्तवाहिन्या व मज्जातंतूचे जाळे असते.
- त्याच्या खाली उपत्वचीय थर असतो तो शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करतो.
- आपल्या त्वचेमध्ये घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात त्यांना धर्मग्रंथी म्हणतात.
- बाह्य त्वचेचा सर्वात जाड स्तर तळपायावर व तळहातावर असतो. या दोन्ही ठिकाणी त्याची जाडी 1.5 मि.मी. इतकी असते.
त्वचेची कार्य
- शरीराच्या अंतरंगाचे - जसे स्नायू, हाडे, इंद्रिय संस्था इत्यादींचे रक्षण करणे.
- शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्यास मदत करणे.
- ड जीवनसत्त्वाची निर्मिती करणे.
- शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवणे.
- उष्णता थंडी यांपासून संरक्षण करणे.
- त्वचा स्पर्श इंद्रिय म्हणून कार्य करते.
मेलानिन
- आपल्या केसांचा रंग मेल्यानींमुळे ठरतो.
- त्वचेच्या थरामधील पेशीत मेलानिन नावाचे रंगद्रव्य असते.
- मेल्यानीन त्वचेतील विशिष्ट ग्रंथी तयार होते.
- मेल्यानींच्या प्रमाणावरून त्वचेचा गोरेपणा काळेपणा ठरतो.
- मेल्यानीन त्वचेचे व आतील भागांचे अतिनिल किरणांपासून संरक्षण करते.
- काळे गडद केस हे शुद्ध मेल्यानींमुळे तर भुरे पांढरे केस मेलेनिन मधील गंधकामुळे आणि तांबडे केस मेल्यानिन मध्ये लोह असल्याने आपल्याला पाहायला मिळतात.
आपल्या शरीरातील हाडे -
हातातील हाडे
एका तळहातामध्ये 13 हाडे असतात बोटांमध्ये एकूण 14 हाडे असतात.
पायातील हाडे
- मांडीमध्ये femur हे हाड असते.
- मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड म्हणून याची ओळख आहे त्याला उर्विका असेही म्हणतात.
तळपायात एकूण बारा हाडे असतात तर पायांच्या बोटांमध्ये एकूण 14 हाडे असतात.
पाठीचा मणका
- मणक्यामध्ये एकूण 33 हाडे असतात.
- परंतु माकड हाड आणि त्रिकास्ती हे जोडून असल्याने मणक्यात 26 हाडे गृहीत धरतात.
- छातीच्या पिंजराच्या बरगड्यात एकूण 24 हाडे असतात.
कानातील हाडे
- प्रत्येक कानात तीन-तीन हाडे असतात.
- त्यातील कडी Stirrup हे कानातील हाड आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे.
- ते तांदळाच्या दाणे एवढे व पोकळ असते.
- त्याचा आकार कडी सारखा असतो.