- खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात.
- पचन संस्थेमध्ये अन्ननलिका व पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो.
- अन्ननलिकेची एकूण लांबी सुमारे नऊ मीटर/ 32 फूट लांब असते.
- मुख, ग्रसनी, ग्रासिका, जठर/आमाशय, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुद्दद्वार यांचा समावेश होतो.
पचनसंस्थेतील इंद्रियांची रचना व कार्य - Structure and function of the organs in the digestive system
१] दात - teeth
- अन्नपचनाची सुरुवात मुखातील दातांच्या कार्यापासून होते.
- दातांचे मुख्यत्वे पटाशीचे, सुळे, दाढा,उपदाढा असे प्रकार आहेत.
- प्रौढ मानवामध्ये एकूण 32 दात असतात.
- पटाशीचे दात 8 असतात
- सुळे दात 4 असतात.
- उपदादा 8 आणि दाढा 12 असतात.
- प्रत्येक दातावर ईनमल या कठीण पदार्थाचे आवरण असते.
- एनामल कॅल्शियमच्या क्षारांपासून बनलेले असते.
- दाताच्या अभ्यासाला ओडियंटॉलॉजी Odontology म्हणतात.
- दुधाचे दात वीस असतात ते पडून पुन्हा नव्याने दुसरे दात येतात म्हणूनच मानवामध्ये संपूर्ण आयुष्यात 52 दात येतात.
२] तोंड The mouth
- तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचन क्रियेला सुरुवात होते.
- तोंडात लाळ ग्रंथी असून लाळेत अमायलेज/ टायलीन नावाचे विकर असते. हे पिष्टमय पदार्थाचे रूपांतर माल्तोज मध्ये करते.
- जिभेवर विविध भागावर चव जाण्यासाठी रुची कलीका असतात.
- जिभेच्या अग्रभागी गोड चव ओळखू शकणाऱ्या रुचिकली का असतात.
- जिभेच्या आतील टोकास कडू चव तर जिभेच्या दोन्ही कडांना खारट व आंबट चव ओळखणाऱ्या रुचिकली का असतात.
३] ग्रसनी / घसा Pharynx / Throat
अन्ननलिकेचे व श्वासन नलिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनी मध्ये उघडते.
४]यकृत Liver
- यकृत ग्रंथीतून पित्तरस स्त्रावला जातो.
- अन्न आम्लारी युक्त करणे तसेच मोठ्या मेदकनांचे लहान कणांत रूपांतर करणे हे पित्त रसाचे काम आहे.
- यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे.
- यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे.
- यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते यामध्ये यकृताने स्त्रवलेला पित्तरस साठवला जातो.
- हा पित्त रस अन्नपचनास सुलभ करतो.
५] लहान आतडे small intestine
- लहान आतडे सुमारे सहा मीटर लांब असते.
- येथेच प्रामुख्याने अन्नाचे पचन व शोषण होते.
- लहान आतड्यात अन्नामध्ये तीन पाचक रस मिसळतात.
- अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते.
६] मोठे आतडे Large intestine
- मोठ्या आतड्यांची लांबी सुमारे 1.5 मीटर असते.
- येथे फक्त पाण्याचे शोषण होते.
- मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स हा छोटा भाग जोडलेला असतो.
- पचनक्रिये नंतर उरलेले पदार्थ गुद्दद्वारा मार्फत शरीराबाहेर टाकले जातात.
७] लाळ ग्रंथी Salivary gland
- कान शिलांजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये लाळ तयार होते.
- लाळे मध्ये टायलीन (अमिलेज) नावाचे विकार असते.
- यामुळे स्टार्चचे रूपांतर माल्तोज या शर्करेत होते.
८ ] ग्रासिका Grasica
- ग्रासिका ही नळी घशापासून जत्रा पर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचे कार्य करते.
९ ] स्वादुपिंड Pancreas
- स्वादुपिंडातून स्वादूरस स्त्रवतो.
- त्यात अमायलेज, ट्रीपसीन, व लायपेज हे विकरे असतात.
१० ] जठर The stomach
- अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवी सारख्या भागाला जठर म्हणतात.
- जठरातील जाठरग्रंथी मधून जाठररस स्त्रवतो.
- जठरात आलेले अन्न घुसळले जाते.
- हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सीन, म्युकस हे जाठर रसाचे तीन घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते.
- जठरात प्रथिनांचे विघटन होते.
- खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकले जाते.
- जठर हे इंग्रजीचे आकाराचे असून शरीराच्या डाव्या बाजूस असते.
पचन संस्थेची संबंधित रोग Diseases related to the digestive system
- कावीळ हा यकृताचा दाह होय.
- यामध्ये एक राधाच्या कार्यात अडथळा येतो व जास्त प्रमाणात पित्त व पित्त रंगद्रव्य स्त्रावले जाते.
- म्हणून डोळे नखे त्वचा व जिभेचा शेंडा पिवळा पडतो.
उलटी व जुलाब हे देखील पचनसंस्थेशी संबंधित रोग आहेत.
मोठ्या आतड्याच्या प्रादुर्भावामुळे आतड्यातून अन्न व पाणी शोषले जाऊ शकत नाही. ते जसेच्या तसे गुद्दद्वारा द्वारे शरीराबाहेर टाकले जाते यालाच जुलाब म्हणतात.
पचन संस्था याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे पहा.
अन्नपचनाच्या पायऱ्या
अंतग्रहण - पचन - अवशेषण - सात्मीकरण - बहीक्षेपण या अन्नपचनाच्या पायऱ्या आहेत.
रक्ताभिसरण संस्था सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली पहा. Circulation Institute Detailed Information