अन्नसुरक्षा, संतुलित आहार आणि जीवनसत्व या विषयावर सराव चाचणी सोडवा



           अन्न, अन्नसुरक्षा, संतुलित आहार आणि  जीवनसत्वे  या विषयावर खालील माहितीच्या नंतर एक चाचणी देण्यात आली आहे. त्यातील सर्व प्रश्न सोडविण्याचा आपण प्रयत्न करावा अशी अपेक्षा.

         दैनंदिन जीवन जगत असताना ते आरोग्यमय जीवन जगण्यासाठी अन्नाच्या बाबतीत जाणीव जागृती असणे खूप महत्त्वाची बाब झाली आहे. हल्ली धावपळीच्या जगामध्ये अनेक जणांचे आपल्या अन्नाकडे मुख्यतः संतुलित आहाराकडे दुर्लक्ष झाले आहे असे म्हणावयास हरकत नाही. हल्ली आहारामध्ये जंक फूडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. आपल्याला आपल्या अन्नाची सुरक्षा अन्नातून आपल्याला मिळणारे पोषक द्रव्य जीवनसत्वे यांची जाणीव असेल तर आपले व आपल्या मुलांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी खूप मदत होईल. हल्ली अनेक प्रकारच्या भाज्या फळे हे हायब्रीड प्रकारचे आले असून त्यामध्ये अनेक प्रकारच्या विविध औषधांचा मारा फवारणीच्या माध्यमातून त्यावर करण्यात येत असल्यामुळे कॅन्सर सारख्या आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. भाज्या फळे अगदी कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचे मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या टॉनिक फवारणीच्या माध्यमातून भाज्यांवरती किंवा फळांवरती प्रयोग मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्याचे दुष्परिणाम हळूहळू जाणवायला लागलेले आहेत. लहान वयात केस पांढरे होने , डोळ्यांची नजर कमी होणे हि याचीच उदाहरणे आहेत. 

         आपल्याला व आपल्या कुटुंबाला निरोगी राहण्यासाठी आपण संतुलित आहार घेतला पाहिजे. म्हणजेच आपल्या आहारामध्ये कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे या सर्वांचं दररोज समावेश अन्नामध्ये असणे खूप आवश्यक बाब झाली आहे. जर आपल्याला या बाबतीत जाणीव असेल याबाबतीत आपल्याला सखोल माहिती असेल तरच आपण व  आपले कुटुंब निरोगी राहू शकतो. आजारी पडल्यानंतर हॉस्पिटल साठी आपण हजारो रुपये खर्च करत असतो मात्र जेव्हा बाजारामध्ये आपण भाजीपाला किंवा फळे आणायला जातो तेथे मात्र पैशांची काटकसर करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. वेळीच एक धागा घातला तर पुढचे नऊ धागे वाचतात या उक्तीप्रमाणे आपण जर अगोदरच आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच पुढे चालू होणारे दुष्परिणाम आपण वाचूवू शकतो.

अन्न, अन्नसुरक्षा, पोषकद्रव्य,पोषण आहार, जीवनसत्व या विषयाची खाली चाचणी देण्यात आली आहे.सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी चाचणी चांगल्या प्रकारे वाचून सोडवण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला त्यातून चांगल्या प्रकारची  माहिती मिळेल. विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न व त्यांची उत्तरे वहीमध्ये लिहून काढली तर त्याचा आपल्याला अनेक परीक्षांसाठी उपयोग नक्कीच होईल यात शंका नाही.

चाचणी सोडवण्यासाठी शुभेच्या.

चाचणी सोडवण्यासाठी खाली क्लिक करा.

START TEST - CLICK HERE