फॉर्म नं. 17 मध्येच शाळा सोडलेल्यांसाठी, १० वी, १२व वी पास होण्याची सुवर्ण संधी



फॉर्म नं. 17 मध्येच शाळा सोडलेल्यांसाठी, १० वी, १२व वी पास होण्याची सुवर्ण संधी , form no.17 ONLINE bhara 

              पाचवी,सहावी, सातवी किंवा आठवी शिकून तुम्ही मध्येच शाळा सोडली आहे. शाळा सोडण्याची अनेक कारणे असू शकतात. आर्थिक कारण असू शकेल किंवा आणखी कोणत्या कारणामुळे तुम्हाला शिक्षण पूर्ण करता आले नसेल. दहावी पास झाल्यानंतर अकरावी मध्ये शाळा सोडली असेल किंवा बारावी पूर्ण करण्यापूर्वीच तुम्ही मध्ये शाळा सोडली असेल तर दहावी, बारावी उत्तीर्ण होण्याची इच्छा असेल अशा उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे.

             महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणामंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खाजगीरीत्या बसून परीक्षा पास करता येते. या प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासाठी फॉर्म नंबर 17 भरावा लागतो. ओंनलाइन अर्ज भरून झाल्यानंतर दहावीच्या खाजगी विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी केलेले अर्ज मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमधून स्वीकारण्याची कार्यपद्धती मार्च 2024 च्या परीक्षेपासून सुरू करण्यात येत आहे. यापूर्वी 17 नंबर फॉर्म भरण्याची सुविधा फक्त बारावी साठी होती. मात्र या वर्षापासून फॉर्म नंबर 17 भरण्याची सुविधा इयत्ता दहावी साठी सुद्धा सुरू करण्यात आली आहे. ऑनलाइन भरलेले अर्ज बारावी साठीचे कोणत्याही मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायचे आहेत.

              ज्या विद्यार्थ्यांनी दहावी किंवा बारावी साठी फॉर्म नंबर 17 ऑनलाईन भरलेला आहे त्यांनी तो ऑनलाइन भरलेला मूळ अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केले बाबत पोहोच पावती, दोन फोटो, मूळ कागदपत्रे आपण अर्ज भरते वेळेस ज्या माध्यमिक शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिले आहे तेथे जमा करण्यात यावे.

फॉर्म भरण्यापूर्वी खालील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा 

form no.17 - 10 वी साठी online

Steps to apply for Maharashtra HSC/SSC Exam 2024

Open the above Website.

Click Application link (Form no 17)

Fill the Form

Pay the Application Fee as mention.

Download the Application Form.

take a print out for further reference.

खाजगी विद्यार्थी म्हणून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, इयत्ता १० वी साठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म नंबर 17 -

  •     फॉर्म नंबर 17 इयत्ता दहावीची परीक्षा देण्यासाठी या वर्षीपासूनच सुरुवात झालेली आहे.
  •  प्रतिकूल परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणामुळे नियमित शाळेतून दहावीपर्यंतचे पूर्ण शिक्षण करून न शकणाऱ्या मुला मुलींसाठी यावर्षीपासून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  •  अर्धवट शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण तुलनेने जास्त आहे.
  •  अशांना फॉर्म नंबर 17 भरता येणार आहे.
  •  यासाठी किमान पाचवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • किमान इयत्ता पाचवी ची परीक्षा मान्यताप्राप्त शाळेतून उत्तीर्ण झालेल्या व वयाची 14 वर्षे पूर्ण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी करण्यास पात्र राहील.
  •  नियमितपणे शाळेत जाऊन परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्याप्रमाणेच विषय योजना असलेल्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेत बसण्याची संधी त्यामुळे परीक्षेच्या दर्जामध्ये व पद्धतीमध्ये बदल नाही.
  • तोंडी अंतर्गत मूल्यमापन श्रेणी विषयांची तयारी व परीक्षा या सर्वांची व्यवस्था संबंधित शाळेमार्फत करण्यात येणार आहे.
  • खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी साठी नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे.
  •  विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दिलेल्या वेबसाईटचा वापर करावा.
  •  अर्ज भरण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
  •  ऑनलाइन अर्जामध्ये विद्यार्थ्यास त्याच्या पत्त्यानुसार व त्यांनी निवडलेले शाळांच्या यादीतून दिसेल त्यापैकी विद्यार्थी शेवटी ज्या शाळेत जात होता ती शाळा किंवा सध्या रहात असलेल्या घराच्या पत्त्यानुसार किंवा नोकरीच्या ठिकाणाच्या पत्त्यानुसार जवळच्या शाळेची निवड विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरताना करावयाची आहे.
  •  या शाळेद्वारेच परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी विषयासंदर्भात कामकाज व मूल्यमापन करावयाचे आहे.

विज्ञान विषयातील महत्वाचे घटक सविस्तर mahiti

इयत्ता दहावी साठी फॉर्म नंबर 17 भरताना लागणारी कागदपत्रे

  • शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत, मूळ प्रत नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र.
  •  आधार कार्ड
  •  फोटो
  •  रहिवाशी प्रमाणपत्र

 ही सगळी कागदपत्रे ऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक असून सदर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत.

संपूर्ण अर्ज भरून झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला त्याने अर्जात नमूद केलेल्या ईमेलवर पाठवली जाईल.

 तसेच संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट, ऑनलाईन शुल्क भरल्याची पावती व हमीपत्र यांच्या दोन प्रती काढून ठेवाव्या लागतील.

इयत्ता दहावी साठी १०००  रुपये नोंदणी शुल्क व १००  रुपये प्रक्रिया शुल्क राहील.

१० वी सविस्तर बुकलेट वाचण्यासाठी

 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी साठी खाजगी विद्यार्थी फॉर्म नंबर 17 - 

  • माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता १० परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दोन वर्षानंतर इयत्ता बारावी परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी पात्र होतात. 
  • दहावी परीक्षा पास होऊन मध्येच शाळा सोडलेली असेल व गॅप पडलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 बारावी साठी भरता येईल.
  • जे उमेदवार कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असतील त्यांनाही ही परीक्षा देता येईल.
  •  यासाठी दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
  • फॉर्म भरण्यापूर्वी खालील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा                    
  • form no.17 - १२ वी साठी फॉर्म भरा

Steps to apply for Maharashtra HSC/SSC Exam 2024

Open the above Website.

Click Application link (Form no 17)

Fill the Form

Pay the Application Fee as mention.

Download the Application Form.

take a print out for further reference.


सरावा साठी टेस्ट सोडवा.

बारावी साठी फॉर्म नंबर 17 भरताना लागणारी आवश्यक कागदपत्रे.

  1. दहावीची मूळ गुणपत्रिका व एक झेरॉक्स प्रत.
  2.  दहावी उत्तीर्ण त्याचे मूळ प्रमाणपत्र व एक झेरॉक्स.
  3.  इयत्ता दहावी ,अकरावी शाळा कनिष्ठ महाविद्यालय सोडल्याचा मूळ दाखला.
  4.  रहिवासी पुरावा- रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक.
  5.  विद्यार्थ्यांचे विहित नमुन्यातील हमीपत्र.

  • फॉर्म नंबर 17 बारावीची परीक्षा देण्यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
  • ऑनलाइन फॉर्म भरताना सांगितलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत.
  • खाजगी विद्यार्थी फॉर्म नंबर 17 नाव नोंदणी करताना शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचे आहे. खाजगी विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शुल्क ६०० रुपये आणि प्रक्रिया शुल्क 100 रुपये असणार आहे.        
  •     १२ वी सविस्तर बुकलेट वाचण्यासाठी

Details Mentioned on Maharashtra HSC Registration Form
Last name/surname
Mother’s name
Type of candidate
Gender
Index No.
Enrollment Certificate No.
Student ID
Application No.
Mobile No.
Residential address
Place of birth
Date of birth
Medium of instruction
Total No. of exemptions claimed
Subject details