शास्त्रामध्ये दिलेले भोजनाचे / जेवणाचे 17 नियम पाळले तर जीवनभर निरोगी राहाल.
हल्ली आजारी पडण्याचे प्रमाण लहान मुलांचे असेल किंवा मोठ्या माणसांचे असेल खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त आहोत. हल्ली शुगरचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. बीपी चा त्रास सुद्धा अनेकांना जाणवू लागला आहे. पोटाचे वेगवेगळे आजार असतील, मणक्याचे आजार असतील, डोकेदुखी असेल असे वेगवेगळे आजारामधून आपण सध्या वावरत आहोत. पूर्वी माणूस 100 ते 105 वर्ष चांगल्या पद्धतीने जीवन जगत असत. तर 70 ते 75 वर्षाचे वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा चांगले काम करत असत. त्यांचे डोळे, दात, केस यासारखे गोष्टी सुद्धा चांगल्या असतात. मात्र हल्ली 8-10 वर्षाच्या मुलांना सुद्धा चष्मा लागलेला पहावयास मिळतो. केस पांढरे होणे, केस गळणे यासारख्या गोष्टी तर सर्वसामान्य झालेले आहेत. या सर्व आजाराना दूर ठेवण्यासाठी आपले दैनंदिन जीवन चक्र चांगले असले पाहिजे. आपले भोजन व्यवस्थित असले पाहिजे. या भोजना संबंधी कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत हे शास्त्रामध्ये 17 नियमांचे आधारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील जास्तीत जास्त नियम पाळून आपल्याला ती सवय लावली तर आपले चांगले आरोग्य राहण्यास मदत होईल.
नियम क्र.1
आधी घेतलेले भोजन पचले नसेल तर त्यानंतर लगेच दुसरे भोजन घेऊ नये. आधी पचलेले भोजनाच्या अगोदर दुसरे भोजन घेतले तर ते विशासमान असते. आपल्याला कडकडीत भूक लागल्याशिवाय जेऊ नये.दोन भोजनामध्ये किमान चार ते पाच तासाचे अंतर असले पाहिजे. साधारण एक वेळेचे अन्न पूर्ण पचन होण्यासाठी साधारण सात तासांचा अवधी लागत असतो.त्यामुळे दोन भोजना मध्ये योग्य वेळ असावा.
नियम क्र.2
योग्य निद्रा अर्धे रोग घालवते. झोप ही चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. सहा ते आठ तास झोप ही झोपेची योग्य वेळ आहे. शक्यतो दुपारी झोपण्याचे टाळावे लागते.चांगली शांत झोप अनेक आजारापासून आपल्याला वाचवत असते. चांगले आरोग्य राखण्यासाठी जशी शरीराला व्यायामाची अन्नाची गरज असते अगदी त्याचप्रमाणे योग्य निद्रेची सुद्धा शरीराला गरज असते.
नियम क्र.3
सर्व डाळिं मध्ये हिरवे मूग सगळ्यात चांगले आहेत. रोगप्रतिबंधक शक्ती यामुळे खूप चांगली वाढते. इतर डाळीमध्ये एक किंवा जास्त दोष असतात. मात्र हिरवे मूग आरोग्यासाठी चांगले आहेत. डाळी आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. मात्र सर्व डाळिं मध्ये हिरवे मूग चांगले. हिरव्या मुगांना मोड आणून खाल्ल्यानंतर ते आणखी चांगले.
नियम क्र.4
लसूण हा कांदा खाण्यापेक्षा आपल्या शरीरासाठी चांगला आहे. लसूण खाण्यामुळे हाडे जोडली जातात. लसणामुळे स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते. जास्त प्रमाणात लसूण खाणे म्हणजे शरीराची उष्णता वाढवणे होय. लसणामध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असते.
नियम क्र.5
कोणत्याही पदार्थाचे अति प्रमाणात खाणे टाळले पाहिजे. कोणतीही गोष्ट मग ती चांगली असेल तरी अति प्रमाणात खाल्ल्यावर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे अति तेथे माती म्हणतात. त्याप्रमाणे कोणती गोष्ट अति खाण्याचा मोह टाळला पाहिजे.
नियम क्र.6
औषधी गुण नसलेले भाजी अस्तित्वातच नाही. सर्व भाज्यांमध्ये काही ना काहीतरी औषधी गुण असतातच. त्यामुळे कोणत्याही प्रकारची भाजी आली तर ती खाण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. काही जणांना कारले आवडत नाही,काहीजणांना भेंडी आवडत नाही, काही जणांना मेथी आवडत नाही असे न करता कोणतीही भाजी आली तरी ती आपण प्राधान्याने खाली पाहिजे. त्यामध्ये काहीतरी पौष्टिकता असतेच असते. त्यामुळे हिरव्या भाज्या खाण्यावर भर दिला पाहिजे.
नियम क्र.7
या जगातील कोणताही वैद्य आपले आयुष्य वाढवू शकत नाही. आपले जीवन निरोगी ठेवण्यासंबंधीची सर्व सूत्रे आपल्या स्वतःच्या हातामध्ये आहेत. बाहेरच्या वैद्यांना किंवा डॉक्टरांना आपले जीवन आरोग्यमय करत नाहीत. बाहेरच्या वैद्यांना किंवा डॉक्टरांना आरोग्याच्या बाबतीत मर्यादा आहेत. आपण निरोगी राहणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. आपण निरोगी राहून वैद्याकडे जाण्याचे टाळले पाहिजे वैद्याकडे किंवा डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आपल्यावर येणार नाही अशा दृष्टिकोनातून आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे.
नियम क्र.8
चिंता आरोग्याची सर्वात मोठी वैरी / शत्रू आहे. चिंता ही लहान असो किंवा मोठी असो खूप घातक असते. चिंता ही चितेप्रमाणे कार्य करत असते. त्यामुळे चिंता करणे सोडून दिले पाहिजे. अति चिंता केली तर त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर, आपल्या मानसिकतेवर आपल्या आत्मविश्वासावर नक्कीच पडत असतात. त्यामुळे चिंता सोडून द्यावी. पण चिंता सोडून देणे सहजा सहजी शक्य नाही. यासाठी योग, ध्यानधारणा, अध्यात्म या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून जर योग्य साधना केली तरी यापासून आपण मुक्त होऊ शकतो.
नियम क्र.9
चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम करताना कोणताही व्यायाम जोरात करू नये. व्यायाम नित्यनेमाने करणे हे आरोग्यासाठी चांगली बाब आहे. मात्र ओढून आणून शरीरावर जास्त जोर देऊ नये. ह्रदयाची धडधड फार मोठ्या प्रमाणात वाढू देऊ नये. योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने व्यायाम केला तर त्याचा निश्चितच फायदा मिळू शकतो. HIGH INTENSITY WORKOUT आपले आयुष्य कमी करते.
नियम क्र.10
अन्न चावून चावून खाल्ले पाहिजे. ज्याप्रमाणे एखादी शेळी पाला चावून चावून खाते त्याचप्रमाणे आपण सुद्धा अन्न चावून चावून खाल्ले पाहिजे. खूप वेळा चावल्यामुळे त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात लाळ मिसळत असते आणि ही लाळ अन्नपचवायला मदत करत असते. अन्न जास्त वेळेस चावले तर ते पचन व्हायला चांगली मदत होते. जलद गतीने जेवलेले जास्त वेळ चावले नाही तर असे अन्न पचायला जड जाते. त्यातून पोटासंबंधी अनेक विकार निर्माण होत असतात.
नियम क्र.11
दररोज थंड पाण्याने अंघोळ केल्यावर नैराश्य निघून जात असते. तसेच मनुष्यातील प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होत असते. अंघोळ करण्याची सर्वात योग्य वेळ ही सूर्योदयापूर्वीच असते. मात्र अनेक जण उशिरा उठून उशिरा अंघोळ करत असतात. सूर्योदयापूर्वी थंड पाण्याने केलेले आंघोळ आपल्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे आपली पचन क्रिया सुद्धा चांगली होण्यास मदत होत असते.
स्नान हे ज्याप्रमाणे शरीर स्वच्छ करते अगदी त्याप्रमाणेच आपले मन सुद्धा स्वच्छ करत असते आपल्या शरीरावर लाखो रंध्र असतात म्हणजेच लहान लहान छिद्र्य असतात त्या क्षेत्रातून आपल्या शरीरात तयार होणारा घाम बाहेर पडत असतो मात्र घाणीमुळे जर हे छिद्र बंद झाले तर त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो त्यामुळे दररोज सकाळी स्वच्छ घासून अंघोळ केली तर आपल्या शरीरावरील छोटे छोटे छिद्र मोकळे होतात व त्यातून घाम बाहेर पडत असतो त्यामुळे दररोज सकाळी अंघोळ करणे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
नियम क्र.12
आपण भोजन केल्यावर लगेच कधीच स्नान करू नये. बरेच जण अगोदर भोजन करतात त्यानंतर अंघोळ करतात.बरेच जण अगोदर भोजन करतात त्यानंतर अंघोळ करतात त्यामुळे आपल्या पचन प्रक्रियेवर परिणाम होत असतो. भोजन केल्यानंतर आपल्या शरीरात उष्मा तयार होत असतो तो अन्नपचनासाठी खूप महत्त्वाचा असतो मात्र जेवण केल्यानंतर लगेचच आंघोळ केली तर तयार होणारा उष्मा जास्त प्रमाणात तयार होत नाही.
नियम क्र.13
पावसाचे पाणी अतिशय शुद्ध असते. पावसाच्या पाण्याची शुद्धता इतर कोणत्याही पाण्याला येत नसते. पावसाच्या पाण्यात कोणत्याही प्रकारचे जीवाणू किंवा विषाणू आढळत नाहीत. आपल्याला होणारे अर्ध्यापेक्षा जास्त आजार दूषित पाणी आपल्या शरीरात गेल्यामुळे होत असतात पाणी शुद्ध पेले तर अनेक से आजार आपण टाळू शकतो.
नियम क्र.14
अपचन हा सुद्धा अनेकांना होणारा त्रास आहे.अपचन झाले तर फक्त पाणी भरपूर प्रमाणात पिले पाहिजे. अपचन झाल्यावर इतर कोणतेही पदार्थ खाणे टाळले पाहिजे. अपचन झाल्यावर पाणी भरपूर प्रमाणात पिल्याने त्याचा चांगला फायदा शरीराला मिळू शकतो. अन्न जास्त प्रमाणात घेणे किंवा अन्न अवेळी खाणे यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो.
नियम क्र.15
शक्यतो शिळे खाणे टाळावे. ताजे तेच घ्यावे. ताजे तेच खावे. शिळे अन्न खाऊ नयेत. शिळ्या अन्नात जिवाणू विषाणू यांची वाढ व्हायला सुरुवात झालेली असते. तसेच त्यांच्यातील पौष्टिकता हळूहळू कमी होत असते. शिळे अन्न खाल्ल्यामुळे जुलाब उलट्या होऊ शकतात.
नियम क्र.16
एका वेळी एका भोजनात गोड, तिखट, कडू, आंबट आणि तुरट सर्व प्रकारचे पदार्थ असावेत. म्हणजे जेव्हा आपण भोजन घेतो तेव्हा आपल्या भोजनात सर्व प्रकारचे पदार्थ असले पाहिजेत. फक्त एकाच प्रकारचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.आपल्या भोजनामध्ये विविधता असेल तर आपल्या शरीराला त्याचा नक्कीच फायदा मिळतो. आपल्या भोजनातून आपल्या शरीराला कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्वे सगळी मिळाली पाहिजे.
नियम क्र.17
पोटात अर्धे अन्न हे घन असले पाहिजे. पाव अन्न द्रव पदार्थ असावे आणि उरलेले पाव भाग हा रिकामा असला पाहिजे. काही जण भरपूर मोठ्या प्रमाणात जेवण करत असतात. पोटामध्ये काहीही जागा रिकामी ठेवत नाहीत. असे करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. जठराचे जर चार भाग केले तर त्यातील दोन भाग हे घनपदार्थाने भरले पाहिजे. म्हणजे घट्ट पदार्थाने भरले पाहिजे. त्यातील एक भाग हा द्रव पदार्थाने भरला पाहिजे. तर एक भाग हा रिकामा असला पाहिजे.रात्रीच्या जेवणाच्या वेळी जर हा आपण एक भाग रिकामा ठेवला तर त्याचा निश्चित चांगला फायदा आपल्या आरोग्यासाठी मिळू शकतो.मात्र जर रात्री जास्त प्रमाणात जेवण केले तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर हळूहळू होत असतो. ज्याप्रमाणे मिक्सरमध्ये एखादा पदार्थ घुसळला जातो अगदी त्याच प्रमाणात सर्व अन्नपदार्थ आपल्या जठरामध्ये घुसळले जात असतात. त्यासाठी जठरात थोडी रिकामी जागा ठेवावी लागते.
जीवाणू - विषाणूजन्य रोग , लक्षणे व लसीकरण सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली पहा.
जीवाणू - विषाणूजन्य रोग , लक्षणे व लसीकरण सविस्तर माहिती