विज्ञान विषयातील महत्त्वाच्या घटकावर आधारित ही चाचणी क्र 4.



विज्ञान विषयातील महत्त्वाच्या घटकावर आधारित ही चाचणी तयार करण्यात आलेली आहे.
  1.  या चाचणीमध्ये एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले आहेत.
  2.  प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुणठेवण्यात आलेले आहेत. 
  3. आपण 30 मिनिटांचा कालावधीत ही चाचणी सोडवू  शकता. 
  4. मिळालेले गुण कमेंट करून  सांगा.
  5.  विद्यार्थ्यांनी हे सर्व प्रश्न वहीत लिहून घेतले तर त्यांना या मुद्यांचा  फायदा मिळेल.
  6. अभ्यास करत असताना आपल्या सरावाला खूप महत्त्व आहे.
  7.  प्रॅक्टिस मेक्स मन परफेक्ट या उक्ती प्रमाने सरावानेच आपण परफेक्ट होत असतो.
  8. सर्वांनी चाचणी सोडवावी,सर्वांना चाचणी सोडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
यापूर्वीची चाचणी सोडवण्यासाठी 

  •      



            मायकेल फॅरेडे हे अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आले होते. त्यामुळे त्यांना काही दिवस पुस्तक विक्रेत्याकडे काम सुद्धा करावे लागले. तेथे त्यांनी अनेक विज्ञान विषयाची पुस्तके वाचली त्यातून त्यांना विज्ञान विषयांमध्ये खूप आवड निर्माण झाली फॅरेडे यांच्या संशोधनामुळे दैनंदिन जीवनातील अनेक उपकरणांमध्ये विजेचा व विद्युत चुंबकाचा वापर करणे आपल्याला शक्य झाले आहे. मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे.

           भारतातील थोर शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ सर सी व्ही रामन.सी व्ही रामन यांनी सादर केलेले प्रकाशाच्या विकीरणासंबंधीचे संशोधन रामन परिणाम किंवा रामन इफेक्ट म्हणून ओळखले जाते. त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी हा शोध लावला होता. त्या शोधाच्या स्मरणार्थ  राजीव गांधी पंतप्रधान असताना 1987 सालापासून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जात आहे.
          प्रसिद्ध शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांनी एक तबकडी बनवली. तिची एक बाजू तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा या सात रंगांच्या समान पाकळ्यांमध्ये विभागणी केली होती. ती तबकडी स्टैंड वर बसून त्यांनी ती जोरात फिरवली. त्यावेळी त्यांना सात रंग न दिसता त्यातून एकच पांढरा रंग दिसला. यावरून त्यांनी सूर्यप्रकाश हा  सात रंगांचा बनला असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे त्या तबकडीस न्यूटन तबकडी असे म्हणतात. न्यूटन यांनी प्रकाश या विषयी ऑप्टिक्स हा ग्रंथ लिहिला आहे.
    ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो त्या पदार्थांना पारदर्शक पदार्थ असे म्हणतात.ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही त्या पदार्थांना अपारदर्शक पदार्थ असे म्हणतात. ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो त्यांना अर्धपारदर्शक पदार्थ म्हणतात.
     डोक्यात 8 आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी एकूण 22 हाडे कवटीमध्ये असतात. छातीमधील पिंजारयासारखी रचना असणाऱ्या भागाला छातीचा पिंजरा असे म्हणतात. छातीत एक उभे चपटे हाड असते त्याला उरोस्थी असे म्हणतात. त्याला आडव्या चपट्या बरगड्यांच्या बारा जोड्या जोडलेल्या असतात. त्यामुळे या सर्व 25 हाडांचा मिळून छातीचा पिंजरा तयार होतो. तो पिंजरा मागून पाठीच्या कण्याला जोडलेला असतो.
    मानवाला निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या संसाधनांची मर्यादा आहे. मात्र मानवाच्या गरजा या अमर्यादित आहेत. मानवी गरजांना निसर्गातील संसाधने कधीही पुरणार नाहीत. त्यामुळे वीज टंचाई सारखा गंभीर प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे. या प्रश्नावर अणुऊर्जेचे उत्पादन एक चांगला पर्यायी मार्ग होऊ शकतो. अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी युरेनियम, थोरियम यासारख्या जड मूलद्रव्यातील अनुच्या विघटनातून निघणाऱ्या उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती केली तर मानवी जीवनाला चांगला पर्यायी मार्ग मिळू शकेल.
    कापूस आणि लाकडाचा लगदा सोडियम हायड्रॉक्साइड या रसायनामध्ये विरघळवून एक द्रावण तयार केले जाते. या तयार केलेल्या द्रावणापासून यंत्रांच्या साह्याने हे धागे तयार करतात. यांना मजबुती आणि चकाकी चांगली असते. म्हणून त्यांना कृत्रिम रेशीम असे म्हणतात. सूर्यकिरणांसारखे चमकदार ते दिसत असल्याकारणाने या अर्थाने त्यांच्यासाठी रेऑन हा शब्द वापरतात.