रक्ताभिसरण संस्था सविस्तर माहिती
रक्ताभिसरण संस्था दोन प्रकारचे असते.
१] खुली रक्ताभिसरण संस्था
- यांच्यात विशिष्ट अशा रक्तवाहिन्या नसतात.
- गोगलगाय, गांडूळ, गोम, विंचू यांच्यामध्ये आढळते.
२] बंद रक्ताभिसरण संस्था
- विशिष्ट रक्तवाहिन्या असतात.
- ज्या शुद्ध व अशुद्ध रक्ताचे वहन करतात.
- सरपटणारे प्राणी उभयचर व पृष्ठवंशीय प्राणी यांच्यामध्ये असते.
- माणूस, मासे,बेडूक, पक्षी इ.
मानवी शरीरातील बंद रस्ताभिसरण संस्था
मानवी रक्ताभिसरण संस्थेत मुख्यतः तीन घटक येतात.
१] रक्तवाहिन्या
२] रक्त
३] हृदय
१] रक्तवाहिन्या
मानवी शरीरात तीन रक्तवाहिन्या असतात.
धमनी,,शिरा, केशवाहिन्या.
A] धमणी
- ज्या रक्तवाहिन्या हृदयापासून दूर शरीराकडे जातात त्यांना धमणी म्हणतात.
- धमणी ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करतात.
- परंतु फुप्पुस धमनी ही अशुद्ध रक्ताचे वहन करते.
- धमण्यांना झडपा नसतात.
- रक्तदाब धमन्या मध्ये जास्त असतो.
- शिरांपेक्षा खोलवर पसरलेल्या असतात.
B] शिरा
- जी रक्तवाहिनी शरीराच्या भागाकडून हृदयाकडे वापरलेले अशुद्ध रक्ताचे वहन करते त्याला शिरा म्हणतात.
- अपवाद फुप्पुसभिगा शिरा यामध्ये शुद्ध रक्त असते.
- शिरा या शरीराच्या त्वचा लागतच असतात.
- शिरांमध्ये रक्तदाब कमी असतो.
- गुरुत्वाच्या विरुद्ध दिशेने रक्ताचे वहन करतात म्हणून त्यांना झडपा असतात.
C] केशवाहिन्या
- या अशा प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात , ज्यांच्यातून रक्त हे पेशीशी संबंधात येते.
- म्हणजेच धमनी व शिरा यांना जोडणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणजे केशवाहिन्या आहे.
- केशवाहिन्या यांची भित्तिका खूपच पातळ असते.
- पेशीशी संबंधित रक्त हे केवळ केशवाहिन्यामार्फतच येते.
- रक्त आणि पेशी यांच्यातील वायूची अन्नाची व उत्सर्जित पदार्थाची देवाणघेवाण ही केवळ केशवाहिन्यामार्फत घडते.
- मानवी शरीरात जवळजवळ 97 हजार किलोमीटर एवढ्या लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.
- रक्तवाहिन्याचा अभ्यास करणे म्हणजे ANGIOLOGY होय.
रक्त
मानवी रक्त दोन घटकांनी बनलेले असते.
१] रक्तद्रव
- रक्तातील रंग नसलेला किंवा फिक्कट पिवळसर अल्कली माध्यम असलेला द्रव म्हणजे रक्तद्रव.
- एकूण रक्ताच्या 55 टक्के भाग म्हणजे रक्तद्रव.
- रक्तद्रव म्हणजे 90% पाणी 7 टक्के प्रथिने आणि उर्वरित 3 टक्के भाग म्हणजे असेंद्रिय घटक.
- रक्तद्रवात चार प्रकारचे प्रथिने असतात.
- Globulin - प्रतीद्रव्ये तयार करणे प्रतिकारक्षमता तयार करणे हे या प्रथिनाचे कार्य आहे.
- Albumin - शरीरातील पाण्याचा समतोल राखणे हे या प्रतीचे कार्य आहे.
- Prothrombin - रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.
- Fibrenogen - रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.
२] रक्तपेशी
RBC - RED BLOOD CELL
- लाल रक्तपेशी या गोलाकार आणि केंद्रक नसलेल्या पेशी आहेत.
- या आकाराने खूप लहान असतात.
- हिमोग्लोबिन नावाच्या घटकामुळे RBC लाल रंग प्राप्त होतो.
- पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये आर बी सी चे प्रमाण कमी आहे.
- RBC साधारणता 127 दिवस जगतात आणि नंतर त्या प्लीहा मध्ये जाऊन मरतात.
- भ्रूनामध्ये या आर बी सी या यकृतात किंवा प्लीहा मध्ये तयार होता.
- तर प्रौढ माणसात या अस्थी मज्जेत तयार होतात.
- RBC मधील हिमोग्लोबिन हा महत्त्वाचा घटक आहे.
- हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ॲनिमिया नावाचा रोग होतो तर हिमोग्लोबिन जास्त झाल्यामुळे पॉलिसायथेमिया नावाचा रोग होतो.
WBC - WHITE BLOOD CELL
आकाराने मोठ्या केंद्रक असलेल्या आणि रंगहीन पेशी आहेत.
WBC साधारण तीन ते चार दिवस जगतात.
WBC चे वेगवेगळे प्रकार आहेत.
WBC चे कार्य -
- सूक्ष्म जीवाला मारणे,
- एलर्जी मध्ये यांची संख्या वाढते
- हिस्टामाईन यांचे वहन करणे,
- प्रतिकारक्षमतेत प्रतिद्रव्य तयार करतात,
- मृत सूक्ष्मजीवांना खातात.
- हीपरिन रक्त शरीरात गोठू नये म्हणून असणारे रसायन.
- हिस्टामाईन सूज आल्यानंतर तिथे स्त्रावणारे रसायन.
कुठलेही प्रकारच्या रोगामध्ये WBC ची संख्या वाढते आणि जेव्हा WBC ची संख्या दोन लाखापर्यंत वाढते त्याला रक्ताचा कर्करोग म्हणतात.
३] रक्तपट्टीका
- यांचा आकार द्वीबहिर्वक्र असतो.
- या फक्त सस्तन प्राण्यातच आढळतात.
- यांचा आकार अतिशय लहान असतो.
- रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.
- या अस्थी मज्जा मध्ये तयार होतात.
- डेंगू, मलेरिया, टायफाईड या रोगात यांचे प्रमाण कमी होते.
महत्वाचे घटक
- शरीराच्या वजनाच्या 8 टक्के भाग म्हणजे रक्त होय.
- रक्ताचा अभ्यास करणे म्हणजे Haematology.
- रक्ताचा साधारणतः pH हा 7.35 ते 7.45 म्हणजे अल्कली असतो.
- मानवी शरीरात साधारणता पाच लिटर रक्त असते.
रक्तगट
- A, B, O या रक्तगटांचा शोध सर्वप्रथम 1900 साली डॉक्टर कार्ल लँडस्टीनर यांनी लावला.
- AB रक्तगटाचा शोध डीकास्तेलो आणि स्टर्ली यांनी लावला.
- AB+ हा रक्तगट सर्व योग्य ग्राही असतो.
- या रक्तगटात सर्व प्रकारचे प्रतिजन आहेत.
- O- या रक्तगटात कुठलाच प्रतिजन नसल्याने हा सर्व योग्य दाता आहे.
- हा रक्तगट सर्व योग्य दाता असतो.
- एकावेळी जास्तीत जास्त तीनशे मिली रक्त रक्तदान करता येते.
- दोन रक्तदानामध्ये किमान तीन महिन्याचा कालावधी राखणे गरजेचे असते.
- रक्ताला खारट चव असते.
मानवी अस्थिसंस्था सविस्तर माहिती Detailed information on the human skeletal system वाचण्यासाठी खाली पहा.