स्वातंत्र दिन भाषण
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे गुरुजन वर्ग इथे बसलेल्या माझ्या बालमित्रांनी मैत्रिणींनो. आज 15 ऑगस्ट 2023आहे. 15 ऑगस्ट हा दिवस आपण प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत असतो. या दिवसाच खूप सारं महत्व आहे. हा आपला राष्ट्रीय सण आहे. मुख्यतः 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन आपले राष्ट्रीय सण आहे. आजचा दिवस आपला खूप आनंदाचा दिवस आहे. कारण या दिवशी आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून दीडशे वर्ष नंतर मुक्त झालो होतो. मित्रांनो ही मुक्तता हे स्वतंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही. यासाठी अनेकांनी आपल्या जीवाची परवा न करता आपल्या प्राणाची आहुती दिली. आपलं घरदार कुटुंब सोडले. अनेक जणांनी तुरुंगवास भोगला. अनेक जणांनी हसत हसत फासावर गेले. तर लहान मुलं सुद्धा या स्वतंत्र लढ्यामध्ये अग्रभागी होते. अनेक महिला सुद्धा या स्वतंत्र लढ्यामध्ये उतरलेल्या होत्या. अशा या लढ्यानंतर आपल्याला स्वतंत्र प्राप्त झाले.
तिरंगी ध्वज आपला अभिमान आहे. मित्रांनो तिरंगी ध्वजामध्ये मुख्यता तीन रंग व मध्ये असलेले निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. या तीन रंगापैकी सर्वात वरती रंग येतो तो केशरी. हा रंग त्यागाचे प्रतीक आहे. ज्या सर्व क्रांतिकारकांनी देशभक्तांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. ज्यांनी आपले रक्त सांडले अशा क्रांतिकारकांचे स्मरण म्हणून हा रंग सर्वप्रथम घेण्यात आलेला आहे. त्या सर्वांचे स्मरण आपण कायम ठेवलं पाहिजे. त्यांच्या उपकारांमध्ये आपण सतत राहिले पाहिजे. त्यांची आठवण आपनास हा रंग सतत देत राहील.
मित्रांनो त्यानंतर मधला रंग येतो तो पांढरा. हा रंग शांतता, सुलभता याचं प्रतीक आहे. आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्म चे लोक राहतात. सर्व लोकांनी आपापसामध्ये मिळून मिसळून राहावे सगळीकडे शांतता नांदावी. सर्व गुण्यागोविंदाने राहावेत, जगावेत याच प्रतीक हा पांढरा रंग आहे. आपापसामध्ये शांतता निर्माण करण्याचं काम तिरंगी ध्वजातील पांढरा रंग करेल.
यानंतर तिसरा रंग येतो तो हिरवा. हिरवा रंग हा आपल्या आपली भूमी सुजलाम सुफलाम राहावे याच प्रतीक आहे. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपली संपूर्ण अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित आहे. आपल्या देशामध्ये अनेक लोक शेती कामाशी निगडित आहेत. शेतमजूर आहेत. त्या सर्वांना भरभरून समृद्धी प्राप्त व्हावी. यासाठी हा तिरंगी ध्वज त्याचे प्रतीक आहे.
यानंतर तरंगी ध्वजाच्या मध्ये एक अशोक चक्र आहे. या अशोक चक्रामध्ये 24 आरे असतात. याचा अर्थ आपण सतत 24 तास कार्य मग्न असलं पाहिजे. सतत काहीतरी करत राहिलं पाहिजे. म्हणजे आपला विकास नक्की होतो. याच हे प्रतीक आहे. तिरंगी ध्वज आपला अभिमान आहे. आपला स्वाभिमान आहे. फिरंगी ध्वजाचा आदर आपण सतत केला पाहिजे. तिरंगी ध्वजाचा सन्मान म्हणजे आपल्या देशात सन्मान आहे. म्हणून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करत असताना तेथे आपला हा तिरंगी ध्वज कायम अग्रेसर असतो. हा तिरंगी ध्वज आपल्याला इतका सहजासहजी मिळालेला नाही. यासाठी हजारो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यांचे स्मरण सतत करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी थांबतो.
जय हिंद, जय भारत.
ENGLISH SPEECH
Honorable dais, all dignitaries present on the dais, my gurujan class, my friends sitting here. Today is 15 August 2023. We celebrate 15th August as Independence Day every year. This day is very important. This is our national festival. Mainly 15th August and 26th January are our two national festivals. Today is our very happy day. Because on this day we were freed from British slavery after one and a half hundred years. Friends, we did not get this freedom easily. Many people sacrificed their lives for this. He left his host family. Many were jailed. Many people went to the gallows smiling. Children were also at the forefront of this independent struggle. Many women were also involved in this independent struggle. After such a struggle we got independence.
The tricolor flag is our pride. Friends, the tricolor flag has three main colors and a blue colored Ashoka Chakra in the middle. Among these three colors, the highest color is orange. This color symbolizes sacrifice. All the revolutionaries who patriots sacrificed their lives for the freedom of their country. This color was first adopted to commemorate the revolutionaries who shed their blood. We should keep the memory of all of them. We should be constantly in their favors. His memory will continue to give us this color.
Friends, after that comes the middle color which is white. This color symbolizes peace, ease. There are many castes and religions living in our country. All the people should live in harmony with each other and there should be peace everywhere. White color is the symbol that all Gunya Govinda should live and live. The white color of the tricolor flag will work to create peace among themselves.
After this comes the third color which is green. Green color is a symbol that our land should be Suphalam Suphalam. Our country India is an agricultural country. Our entire economy is based on agriculture. Many people in our country are engaged in agriculture. are farm labourers. May they all get abundant prosperity. For this, this tricolor flag is its symbol.
After this there is an Ashoka Chakra in the middle of the Tarangi flag. This Ashoka Chakra consists of 24 Areas. This means we have to be busy 24 hours a day. Something must be done constantly. That means our development takes place. This is the symbol. The tricolor flag is our pride. We have self-esteem. We should always respect the Firangi flag. Honoring the tricolor flag means honor in our country. Therefore, when representing the country at the national and international level, our tricolor flag is always at the forefront. We did not get this tricolor flag so easily. Thousands of people have sacrificed their lives for this. It is our duty to keep remembering them. Greetings to them. I bow down at their feet and stop.
Jai Hind, Jai Bharat.