भौतिक राशींचे मापन या घटकावर आधारित सराव चाचणी

 

भौतिक राशींचे मापन -  QUIZ / TEST

 भौतिक राशींचे मापन

           भौतिक राशींचे मापन - आपल्याला विज्ञान समजून घेताना बहुतेक राशी व त्यांचे मापन कशा प्रकारे केले जाते हे सुद्धा समजून घेणे खूप महत्त्वाची बाब ठरते.

       भौतिक राशींमध्ये अनेक वेळा मुले गोंधळण्याची खूप दाट शक्यता असते. मूळतः राशींचे अदिश राशी व सदिश राशी असे दोन प्रकार पडतात. वस्तुमान व वजन हे वरवर दिसायला सारखे शब्द वाटत असले तरी त्यांच्यामध्ये भिन्नता आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. अगदी प्राचीन काळापासून माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे मापन करत आलेला आहे. आज सुद्धा प्रत्येक गोष्टीचे अचूक मापन केले जाते. या भौतिक राशींचे मापन घटकावर वीस प्रश्नांची चाचणी तयार करण्यात आली आहे. या घटकातील अतिशय महत्त्वाचे वीस प्रश्न खालील चाचणीमध्ये आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी ते वीस प्रश्न वहीमध्ये लिहून घ्यावेत.

अधिक सराव खूप उपयुक्त ठरेल.