ओझोन याविषयी सविस्तर माहिती.
ओझोन वायू सर्व सजीव सृष्टीसाठी एक वरदान ठरलेला आहे .पृथ्वीचा सुरक्षा कवच म्हणून ओझोन वायू कडे पाहिलं जातं. हे पृथ्वीचं सुरक्षा कवच मानव त्याच्यात जास्त हव्यासापोटी पृथ्वीवर प्रदूषण निर्माण करून तो सुरक्षा कवच नष्ट करत आहे. यामुळे मानवासोबत इतर सजीव सृष्टीवर दूरगामी परिणाम होत चाललेले आहेत. ओझोनच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण होण्यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून पाळला जात आहे.
16 सप्टेंबर 2023 चे विश्व ओझोन दिवस थीम-
Montreal protocol : Fixing the Ozone layer and reducing climate change.
ओझोन हा ऑक्सिजनचा एक महत्त्वाचा प्रकार आहे.ओझोन हा एक विषारी वायू आहे. प्रत्येक ओझोन रेणू 3 ऑक्सिजन रेणूंनी बनलेला असतो, म्हणून त्याचे सूत्र O3 आहे. जेव्हा अतिनील किरण वरच्या वातावरणातील ऑक्सिजनचे रेणू तोडतात तेव्हा ओझोन वायु तयार होत असतो. जर मुक्त ऑक्सिजनचा रेणू ऑक्सिजनच्या रेणूमध्ये गेला तर हे 3 ऑक्सिजन रेणू मिळून एक ओझोन बनतो.
मानवी शरीर व इंद्रिय संस्था चाचणी सोडवण्यासाठी -
ऑक्सिजनचा एक अॅलोट्रोप, जो ऑक्सिजनवर सूर्याच्या अतिनील किरणांच्या प्रभावाने तयार होतो. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांच्या प्रभावापासून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जीवांचे संरक्षण करण्यासाठी ओझोन वायूला विशेष महत्त्व आहे. क्लोरोफ्लुरोकार्बन च्या प्रभावामुळे ओझोनचा थर कमी कमी होत आहे. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे त्याचा विपरीत परिणाम पृथ्वीवरील सजीवांवर पडत आहे
पृथ्वीच्या वातावरणाचा वरचा 20 ते 50 किमी च्या भागात ओझोन नैसर्गिकरित्या उपस्थित आहे. सूर्या पासून येणाऱ्या अतिनील किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखते आणि त्यामुळे पृथ्वीचे संरक्षण होते.
वातावरणातील पृथ्वीच्या जवळच्या थरात वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्सची पातळी वाढत चालली आहे.त्यावर सूर्यप्रकाश पडला की ही रसायने ओझोन तयार करतात. या पृथ्वीच्या वातावरणाच्या जवळ तयार झालेल्या ओझोनमुळे खोकला, घसा खवखवणे, दम्याचा झटका, ब्राँकायटिस इत्यादी आरोग्यावर विपरीत परिणाम आजार वाढत चालले आहेत. तसेच पृथ्वीच्या वातावरणाच्या जवळ तयार झालेल्या ओझोनमुळे पिकावर देखील वाईट परिणाम होत आहे. पिकांचेही नुकसान होत आहे.
मात्र पृथ्वीच्या वरच्या थरात असलेला ओझोन हा आपल्यासाठी संरक्षणात्मक थरासारखा कार्य करत आहे.तर पृथ्वीच्या थराच्या जवळ असलेला ओझोन आपल्यासाठी आरोग्याच्या समस्या निर्माण करत आहे. याचा अर्थ पृथ्वीच्या वातावरणापासून दूर असलेला ओझोन आपल्यासाठी चांगला तर पृथ्वीच्या जवळ असलेला ओझोन आपल्यासाठी वाईट ठरत आहे.
पृथ्वीवरील वातावरण हा पर्यावरणाचा सर्वात गतीमान घटक आहे. वातावरणातील घटक, त्याचे तापमान आणि स्वयंशुद्धीकरण क्षमता यात पृथ्वीच्या जन्मापासून सतत बदल घडत आले आहेत. तरीदेखील मानवी इतिहासाच्या कालखंडातील या बदलाची गती गेल्या दोन शतकांत पूर्वी कधी नव्हती एवढी जास्त वाढली आहे.
हवा प्रदूषण
पावसाच्या पाण्याबरोबर आम्ल (अॅसिड) येणे व त्यामुळे सजीव सृष्टी व इतर साधनसंपत्तीवर विपरित परिणाम होणे, शहरातील विषारी धुके(SMOG), हरित गृह परिणाम ( ग्रीन हाऊस इफेक्ट) आणि स्ट्रॅटोस्फिअरमधील ओझोनचा थर कमी होणे ही त्यातली काही उदाहरणे होत.
हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण सोडले तर हवेतील ९९.९ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण नायट्रोजन, ऑक्सिजन व इतर पूर्णपणे निष्क्रीय असणार्या वायूंचे असते. हे प्रमाण मनुष्यप्राण्याच्या जन्मापासूनच्या इतिहासात कायम राहिलेले दिसते. याचा अर्थ असा की हवेतील अत्यल्प प्रमाणात असणार्या दूषित वायूंच्या प्रमाणात वाढ झाल्याने हवा प्रदूषण होते. या वायूंमध्ये सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स, नायट्रिक ऑक्साईड व नायट्रोजन डाय ऑक्साईड आणि अनेक प्रकारची क्लोरोफ्लोरोकार्बन संयुगे यांचा मुखत्वे समावेश होतो.
जागतिक ओझोन दिवस का साजरा करावा? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व जाणून घेण्यासाठी
ओझोनच्या थरात घट होत चालली आहे -
पृथ्वीभोवतालच्या वातावरणातील ओझोनच्या थरात घट होणे हे नवे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या अस्तित्वासच धोका निर्माण झाला आहे. हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले असल्याने यावर संशोधन चालू आहे.
पृथ्वीच्या वातावरणात अनेक ठार आहेत. त्यातील स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन वायूचे प्रमाण सर्वात जास्त आढळते. या वायूमुळे हानीकारक वैश्विक किरण ( मुख्यत्वे अल्ट्राव्हायोलेट किरण) काही प्रमाणात अडविले जात असल्याने ते जमिनीवर पोहोचू शकत नाहीत. या थराची जाडी कमी झाली तर हे किरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे सजीव सृष्टीस धोका पोहोचेल. ब्रिटीश अंटार्टिक सर्व्हेच्या शास्त्रज्ञांनी १९८५ मध्ये अंटार्टिकावरील ओझोनच्या थराला भोक असल्याचे शोधून काढले. त्यामुळे तेथील वातावरणात उस्न्ह्तेचे प्रमाण वाढले आहे. बर्फ जास्त प्रमाणात वितळून समुद्राच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे.हि खूप चिंतेची बाब आहे.
ओझोनच्या थरात घट होण्याची काही कारणे -
जे वायू हवा प्रदूषण करतात ते वायू ओझोनचे विघटन करतात असे संशोधनात सिद्ध झाले आहे. यात क्लोरोफ्लोरोकार्बनची संयुगे, विशेषतः CFC-11 (CFCL3) आणि CFC-12(CFCl2) ही संयुगे यांचा समावेश मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या काही दशकात अतिसूक्ष्म थेंबांच्या स्वरुपातील सुवासिक द्रव्ये, फेस निर्माण करणारी रसायने तयार करण्यासाठी या संयुगांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. AC / शीतकामध्ये बाष्पशील वायू म्हणूनही फ्रिऑनचा वापर करण्यात येत आहे. यांचा प्रत्यक्ष सजीव सृष्टीवर कोणताही दुष्परिणाम होत नाही.परंतु ही संयुगे हवेतील मिश्रणामुळे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये पोचली की तीव्र अल्ट्राव्हायोलेट किरणांचा त्यांच्यावर मारा होऊन त्यांचे विघटन होत असते. ClOx आणि BrOx हे रॅडिकल तयार होण्याचे प्रमाण वाढते. त्यातून क्लोरीन वायू मोकळा होतो. क्लोरीनवायुमुळे ओझोनचे विघटन होऊन त्याचे ऑक्सिजन मध्ये रुपांतर हॊण्यासकारणीभूत ठरतो. त्या वातावरणात क्लोरीन वायू तसाच राहिल्याने एका क्लोरीनच्या अणुमुळे हजारो ओझोन रेणूंचे ऑक्सिजनमध्ये रुपांतर होते. ओझोनचे विघटन करणार्या या क्लोरिनेटेड संयुगांचे स्ट्रॅटोस्फिअरमधील प्रमाण पूर्वीच्या मानाने ४ ते ५ पटीने वाढले आहे.त्यात दरवर्षी ५ टक्क्यांनी वाढ होणे चालू आहे. हि मानवी तसेच इतर सजीव सृष्टी साठी धोक्याची घंटा आहे.
ओझोनच्या थरातील घट आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम
जर ही परिस्थिती अशीच चालू राहिली तर नजिकच्या काळात अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे वनस्पती व प्राणीमात्रांवर त्याचा विपरित परिणाम होईल. अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. पूर्वीपेक्षा आता अनेक जणांना त्वचेचा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे.हि निश्चित चांगली वेळ नसणार आहे.
अल्ट्राव्हायोलेट किरण जर ओझोन वायू मार्फत शोषले न गेल्याने उष्णता निर्माण होण्याची क्रिया थांबेल. त्यामुळे वातावरण थराच्या तापमानात घट होऊन त्याचा परिणाम वातावरणातील वार्यांच्या दिशा व गतीवर हॊईल. सूनामीसारखी संकटे वाढत जातील. शेवटी सार्या जीवसृष्टीचा सर्वनाश होईल.
विश्व ओझोन दिवस कधीपासून आणि कसा आणि का साजरा करतात असा प्रश्न आपल्या मनात नेहमी पडतो. विश्व ओझोन दिवसाचा इतिहास जुना आहे. 22 मार्च 1985 रोजी ओझोन थराच्या संरक्षणासाठी व्हिंएन्ना या ठिकाणी एक अधिवेशन भरवण्यात आले होते. त्या अधिवेशनात एक ठराव मांडण्यात आला आणि तो सर्वांनी स्वीकारला. ओझोन थरातून छिद्र शोधून काढल्यानंतर हा ठराव मांडला आणि सर्वांनी स्वीकारला. हा ठराव सर्व देशाने स्वीकारल्यानंतर 16 सप्टेंबर 1987 रोजी ओझोन थोर नष्ट करणाऱ्या पदार्थावरील मॉँट्रिअल प्रोटोकॉल लागू करण्यात आला.1994 मध्ये यूएन जनरल असेंबली मध्ये या ठरावावर स्वाक्षरी करून विश्व ओझोन स्तर दिवस स्वीकारला.
जागतिक ओझोन दिवस हा 1987 मध्ये ओझोनचा थर कमी करणाऱ्या पदार्थावरील मॉँटरियल प्रोटोकॉल यावर सर्व देशांनी स्वाक्षरी केल्याच्या स्मरणार्थ 16 सप्टेंबर हा ओझोन संरक्षण दिन हा उपक्रम राबवला जात आहे. हा दिवस ओझोनचा जो रास होत चाललेला आहे त्याबद्दल जनमानसात जागरूकता वाढवण्याचा आणि ओझोनचे थर संरक्षण करण्यासाठी जागतिक प्रयत्नांना यशाचा उत्सव साजरा करण्यासाठीचा दिवस आहे.