मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन.

 



      भारत देशावर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून 15 ऑगस्ट 1947 रोजी मुक्त झाला. हे स्वातंत्र्य भारताला काही सहजासहजी मिळाले नव्हते. यासाठी अनेकांनी आपले बलिदान दिले होते. कित्येकांनी आपले घरदार यांच्यावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी स्वतःला वाहून घेतले होते. त्याचा परिणाम म्हणजे आपण सर्व देश भक्तांनी पाहिलेली सोनेरी पहाट. भारतीय स्वातंत्र्याची पहाट. 

      भारताला स्वतंत्र मिळाले तरी भारतामधील परिस्थिती अस्थिर होती. भारतामध्ये अनेक संस्थाने होती. इंग्रजांनी भारत देशाला स्वातंत्र्य देत असताना संस्थानिकांना अनेक प्रकारचे स्वातंत्र्य दिले. जर त्या संस्थानिकांना वाटले भारतात सामील व्हावे तर ते भारतात सामील होऊ शकत होते. जर त्यांना वाटले पाकिस्तान मध्ये सामील व्हावे तर ते पाकिस्तान मध्ये सुद्धा सामील होऊ शकत होते, किंवा संस्थानिकांना जर वाटले की आपण स्वातंत्र रहावे तर इंग्रजांनी त्यांना स्वातंत्र्य राहण्याचे सुद्धा अधिकार दिलेले होते. त्यामुळे अनेक संस्थानिकांनी स्वातंत्र्य राहायचे  ठरवले होते. त्यामध्ये हैदराबादचे निजाम यांनी सुद्धा स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.

       आज महाराष्ट्राचे जे प्रादेशिक विभाग आहेत त्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाडा आणि विदर्भ असे भाग आहेत. यापैकी मराठवाडा हा हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता. भारत देश स्वतंत्र झाला तरी मराठवाडा अजूनही हैदराबादच्या निजामाच्या गुलामगिरीत खितपत पडला होता. मराठवाडा अजूनही पारतंत्र्यात होता.

         भारत स्वतंत्र झाला तरी भारतात लहान मोठी अशी 552 संस्थाने होती. त्या सर्व संस्थानिकांना इंग्रजांनी स्वातंत्र्य दिले होते. यापैकी अनेक संस्थाने भारतात विलीन झाली. परंतु काही संस्थानांनी भारतात विलीन होण्यास स्पष्ट नकार दिला. त्यातील एक म्हणजेच हैदराबाद संस्थान. या संस्थानावर मीर उस्मान अली खान या निजामाची सत्ता होती. मीर उस्मान अली खान याला त्याचे स्वतंत्र राज्य हवे होते. मात्र संस्थानांमध्ये जी प्रजा होती त्यांना स्वतंत्र भारतात सामील व्हायचे होते. प्रजेचा ओढा भारत देशाकडे होता. मात्र संस्थानिकांनी भारतात सामील होण्यास नकार दिला.

इतर विविध कार्यक्रमांचे भाषण


      स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा मुक्ती संग्राम लढा उभा राहिला. या लढ्याला विरोध करण्यासाठी निजामाचा सेनापती कासिम रजवी यांनी रजाकार ही संघटना स्थापन केली. या संघटनेमध्ये त्याने अनेक मुस्लिम स्वयंसेवकाची भरती केली. या रजाकरांनी प्रजेवर खूप अत्याचार केले. प्रजेवर खूप मोठ्या प्रमाणात जुलूम केले. अनन्वित अन्याय केला.प्रजा रजांकांराना त्रासून गेली होती.

      या अत्याचारांनी सर्व प्रजा त्रासून गेली होती. मराठवाडा मुक्ती संग्राम यामध्ये आघाडीवर होते स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्रॉफ, पानसरे अशा अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राण्यांची कधीही परवा न करता निजामाच्या विरुद्ध संघर्ष सुरू ठेवला. त्यांनी प्रत्येक गावागावांमध्ये संघर्षामध्ये उतरण्यासाठी जनतेचे प्रबोधन केले. येथील प्रत्येक लोकांच्या मनात संघर्षाची ज्योत त्यानी पेटवली. या लढ्यामध्ये अनेकांना वीरमरण सुद्धा आले. या लढ्यासाठी ज्यांनी हसत हसत हुतात्म पत्करलं अशा सर्व हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या कार्याचे मोल काढणे शक्य नाही. त्यांचं कार्य अनमोल असेच आहे. 

        शेवटी भारताचे त्यावेळचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो राबविले. या ऑपरेशन पोलो अंतर्गत निजामाच्या विरुद्ध सरदार वल्लभाई पटेल यांनी लष्करी कार्यवाही सुरू केली. 13 सप्टेंबर 1948 रोजी या लष्करी कारवाईला सुरुवात झाली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी आक्रमक भूमिका घेत हैदराबाद संस्थानाला भारतात विलीन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. सर्व बाजूंनी निजाम संस्थानावर कारवाई करण्याचे आदेश दिले. निजाम संस्थानावर कारवाई करण्यास सुरुवात झाली. सर्व परिस्थिती पाहून निजामाची कोंडी झाली. आता भारतात विलीन होण्याशिवाय निजामाकडे पर्याय उरला नाही. शेवटी पराभव पत्करून निजामास माघार घ्यावी लागली. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबादच्या सेनाप्रमुखांनी पराभव पत्करून शरणागती पत्करले. निजामाचा पराभव झाला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करून घेण्यास सरदार वल्लभभाई पटेल यांना यश आले. हैदराबाद संस्थानावर भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. लोकांना खूप आनंद झाला. त्यांच्या आनंदाला उदान आलेहोते. हैदराबाद संस्थानातील सर्व जनतेने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. तेव्हापासून १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो.

      पूर्वीचे औरंगाबाद व आत्ताचे संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव हे मराठवाड्यातील 8 जिल्हे तेव्हा निजामाच्या राजवटीमध्ये होते. भारतामध्ये जी सर्व संस्थांने होते त्या सर्व संस्थांनामध्ये निजाम सर्वात बलाढ्य संस्थानिक होता. मराठवाड्यासह सध्याचे तेलंगणा राज्य आणि कर्नाटक मधील काही भाग मिळून निजामाचं संस्थान तयार झालेलं होतं. निजामशाहीच्या राजवटीतील नागरिकांनी देशाच्या अन्य भागापासून प्रेरणा घेत स्वातंत्र्याची चळवळ उभा केली. या चळवळीचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्वीकारलं. मराठवाड्यातील प्रत्येक गावागावा पर्यंत स्वातंत्र्यलढा लढला गेला. प्रत्येक गावामधून स्वतंत्र सैनिक पुढे येऊ लागली. स्वातंत्र्य सैनिक स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू केली. संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांना भारतात विलीन होण्याची तीव्र इच्छा होती.

       संपूर्ण मराठवाड्यात निजामाने उभे केलेले सैन्य रझाकार यांची दहशत होती. मराठवाड्यातील प्रत्येक गावामध्ये निजामाची फौज त्याचे स्वयंसेवक तयार होते. या रजाकरांनी नागरिकांवर अनन्वित अत्याचार करण्यास कुठलीही कसर सोडली नाही. मराठवाड्यातील एकही जिल्हा त्या जिल्ह्यातील एकही गाव त्यांच्या तावडीतून सुटले नाही. या रजाकरांच्या बळावर स्वातंत्र्य देश तयार करण्याची निजामाचे महत्त्वकांक्षा होती. निजामाची हे फुटीर वृत्ती भारत सरकारला कधीही मान्य झाली नव्हती. 

      स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्याकडे देशातील संस्थानिकांच्या विलीनीकरणाची जबाबदारी देण्यात आली होती. सरदार वल्लभाई पटेल यांनी अनेक संस्थानिका भारतात विलीन होण्यासाठी प्रयत्न केले. भारतात संस्थानिक सामील करून घेण्यासाठी, भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे फायद्याचे आहे हे सरदार पटेल यांनी संस्थानिकांना पटवून दिले. त्यांनी संस्थानिकांना आव्हान केले की संस्थानिकांनी भारतात विलीन व्हावे. त्यांच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश येऊन जुनागड, हैदराबाद व काश्मीर हे संस्थान सोडता इतर सर्व संस्थाने भारतात विलीन झाले. संस्थानांच्या वेलीनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी कणकर भूमीका घेतली.त्यांच्या प्रयत्नांना यश सुद्धा आले मात्र काही मोजके संस्थांनीक अजूनही स्वतंत्र भारतामध्ये विलीन झालेले नव्हते. त्यापैकी हैदराबादचे निजाम संस्थान हे एक होते.

      सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाशी चर्चा करायला सुरुवात केली. सरदार वल्लभाई पटेल यांना असे वाटले की चर्चा करून हा प्रश्न शांततेत सोडवूया. पण त्यांच्या प्रयत्नांना सुरुवातीला यश आले नाही. निजामाला भारतात सामील होणे मान्य नव्हते. चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर भारत सरकारने लष्करी कारवाई करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या विरोधात पोलीस ॲक्शन सुरू करण्याची घोषणा केली. त्यांनी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केले. भारतीय लष्कराच्या पराक्रमामुळे निजामाच्या रजाकारांनी माघार घेतली. मराठवाड्याची निजामाच्या राजवटीतून मुक्तता झाली.  संपूर्ण हैदराबाद संस्थान आणि मराठवाड्याचे नागरिक आता भारताचे नागरिक बनले. निजामाची जुलमी राजवट उलथवून स्वातंत्र्याची नवीन पहाट आणण्यासाठी ज्या शूर स्वातंत्र सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले, ज्यांनी  आयुष्य वेचले त्या सर्वांचे शतशः नमन. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील वर्षभर हैदराबाद संस्थानातील जनतेने अत्याचार सहन केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरानंतर येथील जनतेला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले.

      17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा दिवस. संपूर्ण मराठवाड्यात मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश 15 ऑगस्ट 1947 मध्ये झालेला नव्हता. हा प्रदेश 17 सप्टेंबर 1948 मध्ये जनतेच्या स्फूर्तीदाही लढ्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये विलीन करण्यात आला होता. हैदराबाद मुक्तिसंग्रामात सरदार वल्लभभाई पटेल, वेद प्रकाश शामलाल, गोविंद पानसरे, बहर्जी शिंदे, श्रीधर वर्तक, जनार्दन मामा, शोभ उल्ला खान इत्यादी महत्त्वाच्या व्यक्तींनी हौतात्म्य पत्करले त्या सर्वांचे बलिदान भारतीयांना प्रेरणादायी ठरलेले आहे. यावरून हैदराबादच्या मुक्ती लढ्यात मराठवाड्यातील नेत्यांचा आणि जनतेचा सिंहाचा वाटा होता ही अविस्मरणीय बाब आहे.

Tags: