mscepuppss पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती [इ.5 वी] व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा [ इ 8 वी ] परीक्षा फॉर्म भरणे - 2024

 



  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी  परीक्षा फॉर्म भरणे - 2024

  •  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याबाबत सविस्तर सूचना.
  • सर्वप्रथम शाळा नोंदणी करावी लागते.
  • शाळा नोंदणी प्रपत्र भरल्यानंतरच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदन पत्र उपलब्ध होत असतात.
  •  लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्ड वरील डाव्या बाजूस असलेल्या std. 5th PUP  या बटनावर क्लिक करावे लागते.
  • त्यानंतर आपणास Registration व Fee payment असे दोन पर्याय दिसतील.
  •  रजिस्ट्रेशन या बटणावर क्लिक केल्यानंतर आपणास ऑनलाइन आवेदन पत्र भरण्यासाठी उपलब्ध होतील.
  • फॉर्म भरण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
फॉर्म भरण्यासाठी खाकी क्लिक करा.


  •   प्रत्येक आवेदन पत्रास स्वतंत्ररीत्या विद्यार्थी आवेदन पत्र क्रमांक जनरेट होत असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांचा फोटो व स्वाक्षरी ऑनलाइन आवेदन पत्रात अपलोड करणे गरजेचे आहे. त्यामुळे ऑनलाइन आवेदन पत्र भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे फोटो व स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करून जतन करून ठेवावेत.
  •   विद्यार्थ्यांचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी कार्यपद्धती 8.5 सेंमी × ४.५ सेंमी आकाराच्या पांढऱ्या कागदावर रंगीत फोटो चिकटवून त्याखाली काळाच्या पेनाने स्पष्ट दिसेल अशा स्वरूपात विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करावी. सदरचा फोटो व स्वाक्षरी एकत्र स्कॅन करावी. फोटो व स्वाक्षरी jpg, jpeg किंवा png या फॉरमॅटमध्ये Save करावी लागते. फोटो व स्वाक्षरीच्या या फाईलची साईज 100 kb पेक्षा जास्त नसावी.
  •   फॉर्म भरायला सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम सर्व माहिती इंग्रजी कॅपिटल लेटर्स मध्येच भरावी लागते. विद्यार्थ्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी.

           लिंग, दिव्यांग आहे का?  विद्यार्थ्यांचा जन्म दिनांक, महाराष्ट्राचा रहिवासी आहे का? ही सर्व माहिती अचूक भरावी. विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नंबर असेल तर त्यावरील12 अंकी आधार कार्ड क्रमांक व्यवस्थित अचूक भरावा. जर एखाद्या विद्यार्थ्यास आधार कार्ड मिळाले नसल्यास आधार नोंदणी केलेली असेल तर आधार नोंदणी रिसीट वरील 28 अंकी आधार एनरोलमेंट क्रमांक भरावा. विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड क्रमांक किंवा आधार एनरोलमेंट क्रमांक असणे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही.

          सुरुवातीला शाळा माहिती प्रपत्र भरतेवेळी जे माध्यम निवडलेले असेल तेच माध्यम ऑनलाईन आवेदन पत्रात उपलब्ध होणार आहेत. उपलब्ध असलेल्या माध्यमांपैकी विद्यार्थी ज्या माध्यमातून परीक्षेस प्रविष्ट होणार आहेत ते माध्यम निवडावे लागेल. सेमी इंग्रजी माध्यम निवडल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर क्रमांक एक मधील गणित या विषयाची व पेपर क्रमांक दोन मधील बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्नपत्रिका मूळ माध्यम आणि इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून मिळेल व त्यानुसार गुणदान करता येईल.

          विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम स्क्रीनवर उपलब्ध होतील. त्यापैकी विद्यार्थी सध्या शाळेत शिकत असलेला अभ्यासक्रम अचूकपणे निवडला पाहिजे. महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीसाठी विचार केला जातो. चुकीचा अभ्यासक्रम नोंदविल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीस अपात्र ठरल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील. अशा मुख्याध्यापकाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याची शिफारस करण्यात येईल.

        पालकांचे उत्पन्न निवडत असताना वीस हजार रुपये पर्यंत किंवा वीस हजार रुपये पेक्षा जास्त या दोन पैकी अचूक पर्याय निवडावा. संबंधित विद्यार्थ्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास वार्षिक उत्पन्न वीस हजार रुपये पेक्षा कमी असा पर्याय निवडून नये. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 20000 रुपये पर्यंत असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ते शालेय स्तरावर जतन करून ठेवावे. जर परिषदेने मागणी केली तर ते उपलब्ध करून द्यावे लागेल.

        विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व पालकांचा ईमेल आयडी उपलब्ध असेल तर नमूद करावा मात्र उपलब्ध नसेल तर ते अनिवार्य असणार नाही.

       आदिवासी क्षेत्रातील आदिवासी हा पर्याय आदिवासी विद्यानिकेतन प्रवेशाबाबत आहे. विद्यार्थी शासनाने जाहीर केलेल्या आदिवासी क्षेत्रातील आदिवासी ST असल्यास होय हा पर्याय निवडावा. आदिवासी क्षेत्रातील नसल्यास नाही हा पर्याय निवडावा.

विद्यानिकेतन प्रवेश बाबत -

        पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेसाठी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. पुढीलपैकी आवश्यक लागू असलेल्या विद्यानिकेतन प्रवेश याबाबत योग्य ते पर्याय निवडावे लागतील.

शासकीय विद्यानिकेतन मध्ये प्रवेश हवा आहे का?

        या प्रश्नाच्या संदर्भात प्रवेश हवा असल्यास आहे पर्याय निवडावा. नको असल्यास नाही पर्याय निवडावा. यासाठी काही अटी आहेत. त्या खालील प्रमाणे -

  •   ग्रामीण क्षेत्रातील शासनमान्य शाळेतील इयत्ता पाचवी मध्ये शिकणारा विद्यार्थी प्रवेश परीक्षेस बसू शकतो.
  •  या विद्यानिकेतन मध्ये केवळ मुलांनाच प्रवेश आहे मुलींना प्रवेश नाही.
  •  फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.
  • वरील अटींची पूर्तता होत असल्यास यामध्ये याचा पर्याय ऍक्टिव्ह राहील.
  •  वरील अटीत विद्यार्थी बसत नसल्यास या मुद्द्याचा पर्याय डीऍक्टिव्हेट राहील.

आदिवासी विद्यानिकेतन मध्ये प्रवेश हवा आहे का?

या प्रश्नाचे उत्तर देते वेळेस प्रवेश हवा असल्यास पर्याय आहे पर्याय निवडा. नको असल्यास नाही पर्याय निवडा. मात्र यासाठी काही अटी आहेत. त्या खालील प्रमाणे- 

  •  विद्यार्थी शासनाने जाहीर केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील रहिवासी असावा.
  •  तो अनुसूचित जमातीतील म्हणजेच ST असावा. 
  • या विद्यानिकेतन मध्ये केवळ मुलांना प्रवेश आहे. 
  • मुलींना प्रवेश नाही. 
  • फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील विद्यार्थी असावा.
  •  वरील अटींची पूर्तता होत असल्यास या मुद्द्याचा पर्याय Active राहील वरील, अटीत विद्यार्थी बसत नसल्यास यामध्ये याचा पर्याय डीऍक्टिव्हेट राहील.

       विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन मध्ये प्रवेश हवा आहे का?

  •  या प्रश्नाचे उत्तर देते वेळेस प्रवेश हवा असल्यास आहे पर्याय निवडा.
  •  नको असल्यास नाही पर्याय निवडा. यासाठी काही अटी आहेत त्या खालील प्रमाणे-

  • राज्य शासनाच्या समाज कल्याण खात्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रम शाळेतील इयत्ता पाचवी शिकणारा विद्यार्थी असावा. 
  • या विद्यानिकेतन मध्ये दोघानाही मुलगा मुलगी प्रवेश असणार आहे. 
  • वरील अटींची पूर्तता होत असल्यास यामध्ये असा पर्याय ऍक्टिव्ह राहील. 
  • वरील अटीत विद्यार्थी बसत नसल्यास या मुद्द्यांचा पर्याय डी ऍक्टिव्हेट राहील.

  परीक्षा शुल्काच्या बाबतीत

     पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी यामध्ये बिगर मागास व मागास विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फी वेगळी असणार आहे.

      पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या दोन्ही परीक्षांसाठी बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी 200 रुपये फी असणार आहे. तर मागास किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 125 रुपये परीक्षा फी असणार आहे.

         फॉर्म भरण्यासाठी 1 सप्टेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदत असणार आहे त्यानंतर 1 डिसेंबर 2023 ते 15 डिसेंबर २०२३ यादरम्यान विलंब शुल्क भरून फॉर्म भरता येतील.

  विद्यार्थ्यांची बँक खात्याची माहिती - 

        बँक खात्याची माहिती भरते वेळेस विद्यार्थ्यांची बँक खात्याची माहिती भरावी. विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक उपलब्ध नसल्यास विद्यार्थ्यांच्या आई वडील किंवा पालक यापैकी कोणाही एकाच्या आधार कार्डशी संलग्न बँक खात्याची माहिती भरावी. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्यासाठी आधार कार्डशी संलग्न बँक खाते क्रमांक असणे अनिवार्य आहे.

   अत्यंत महत्त्वाच्या सूचना 

  •   ऑनलाइन आवेदन पत्रातील सर्व माहिती भरल्यानंतर सेव अँड प्रिव्ह या बटनावर क्लिक करावे.
  •  आपणास विद्यार्थ्यांची ऑनलाइन भरलेले सर्व आवेदन पत्र स्क्रीनवर दिसेल.
  •  ऑनलाईन आवेदन पत्रात काय दुरुस्ती करायची असल्यास edit या बटनावर क्लिक करून दुरुस्ती करता येईल.
  •  ऑनलाइन आवेदन पत्रात भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून submit या बटनावर क्लिक करावे.
  •  डॅशबोर्ड मध्ये आपल्या शाळेच्या ऑनलाईन आवेदन पत्रात भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी  Pending Payment Student List मध्ये दिसेल.
  • फी पेमेंट करण्यासाठी डाव्या बाजूस असलेल्या std.5 PUP यामधील FEE Payment या बटनावर क्लिक करावे. 
  • क्लिक केल्यानंतर आपणास Pending Payment Student List मध्ये आवेदन पत्र भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित यादी दिसेल.
  •  सदर यादीतील एखाद्या विद्यार्थ्यांचे शुल्क आपणास भरावयाचे नसल्यास त्या विद्यार्थ्यांच्या नावासमोरील चेक बॉक्स वर क्लिक करून डीसेलेक्ट करावे.
  •  त्यानंतर स्क्रीनवरील उजव्या बाजूस असणाऱ्या  Proceed To Payment या बटनावर क्लिक करावे.
  •  क्लिक केल्यानंतर पेमेंट गेटवेचे पेज स्क्रीनवर दिसेल. त्यावरील Confirm & Pay या बटणावर क्लिक केल्यानंतर योग्य त्या पर्यायाची निवड करून आवश्यक माहिती भरावी.
  • Make Payment  या बटणावर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करावी.
  •  त्यानंतर आपणास भरलेल्या शुल्काची ऑनलाईन रिसीट प्राप्त होईल.
  •  ती आपल्या जवळ जतन करून ठेवावी.
  •  ऑनलाइन आवेदन पत्र भरलेल्या विद्यार्थ्यांची शुल्क भरल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची नावे Successfully Register Student List मध्ये दिसतील व सदर विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होईल.

Tags: