Quiz/test No.7 नैसर्गिक साधन संपत्ती या घटकावर आधारित सराव चाचणी
नैसर्गिक साधन संपत्ती, खनिजे, धातूके, वनसंपत्ती महासागर या उपघटकावर आधारित सराव चाचणी सोडवा.
खाली महत्त्वाच्या वीस प्रश्नाची एक चाचणी देण्यात आलेली आहे. ही चाचणी ग्रहणे,ध्वनी, चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म,आणि अवकाश तारकांच्या दुनियेत या घटकावर आधारित आहे. या घटकातील महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव होण्याच्या दृष्टिकोनातून प्रश्न काढण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न व त्यांची उत्तरे वहीत लिहून त्यांचा योग्य पद्धतीने अभ्यास करावा. चाचणीच्या खाली काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. ते सर्व मुद्दे प्रश्नांना अनुसरून आहेत. त्या प्रश्नांबद्दल अधिक माहिती मिळण्यासाठी उपयुक्त होतील. ते सर्व मुद्दे सखोल वाचन करावे.
चाचणी सोडवण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
ADITYA - L1 मिशन भारतातील पहिली वेधशाळा श्रेणी अंतराळ आधारित सौर मोहीमे बद्दल सविस्तर माहिती वाचा
वनस्पतींच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशास जंगल म्हणतात. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजेच जंगल होय. जगामध्ये एकूण जेवढा भूभाग आहे त्यापैकी सुमारे 30 टक्के भूभाग जंगलाने व्यापलेला आहे. जंगल अनेक प्रकारे मनुष्याला उपयोगी ठरत आलेले आहे.
सीएनजी हा खूप महत्त्वाचा वायू आहे. याची सर्वसाधारण वैशिष्ट्ये खालील प्रमाणे सांगता येतील.
सीएनजी हा सहज पेठ घेतो.
हा वायू ज्वलनानंतर घनकचरा शिल्लक ठेवत नाही.
कमी प्रमाणात कार्बन-डाय-ऑक्साइड आणि पाणी तयार होते.
या वायूच्या ज्वलंनातून इतर प्रदूषके तयार होत नाहीत.
हा सहजतेने वाहून नेता येतो.
ज्वलनानंतर सहज नियंत्रण ठेवता येते.
दगडी कोळसा खाणींमध्ये सापडत असतो. पीठ, लिग्नाइ,ट बिट्युमिनस, कोल. अन्थ्रासाईट हे दगडी कोळशाचे विविध प्रकार आहेत. यामध्ये सर्वात उच्च प्रतीचा कोळसा म्हणून अन्थ्रासाईट ओळखला जातो. दगडी कोळसा हा कार्बनचा साठा असून त्यापासून मोठ्या प्रमाणात औष्णिक ऊर्जा मिळवण्यासाठी तो जाळला जातो. जे विविध औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहेत त्यामध्ये दगडी कोळसा इंधन म्हणून वापरत असतात. दगडी कोळशापासूनच प्रोड्युसर आणि वॉटर गॅस अशा प्रकारचे वायुरूप इंधनांची निर्मिती केली जात असते.
यापूर्वीच्या घटक निहाय सराव चाचणी सोडवण्यासाठी खाली पहा.
ONGC लाच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ असे म्हणतात. या महामंडळाची स्थापना 14 ऑगस्ट 1956 रोजी झाली होती. हे महामंडळ भारतातील सर्वात मोठी तेल आणि वायु संशोधन आणि उत्पादन कंपनी आहे. तिचे मुख्यालय डेहराडून उत्तराखंड येथे आहे.
विविध औषधी वनस्पती -
आपल्याला माहित आहे की अनेक वनस्पतींचा उपयोग औषधी म्हणून केला जातो. अनेक वनस्पती आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आलेल्या आहेत.
- अडुळसा या वनस्पतीचा उपयोग खोकला कफ दूर करण्यासाठी केला जातो.
- बेल या वनस्पतीचा उपयोग अतिसारावर इलाज म्हणून केला जातो.
- कडुनिंब या वनस्पतीचा उपयोग ताप सर्दी यावर इलाज म्हणून केला जातो.
- सदाफुलीच्या अर्काचा कॅन्सर वर उपचार म्हणून उपयोग केला जातो.
- तसेच समुद्र काकडी याचा देखील कॅन्सर तसेच ट्यूमर रोखण्यासाठी औषध म्हणून वापर करतात.
- दालचिनीचा वापर अतिसार मळमळ यावर इलाज म्हणून केला जातो.
- सिंकोना या वनस्पतीचा उपयोग मलेरियावर औषध म्हणून केला जातो.
- अश्वगंधा, शतावरी, आवळा, हिरडा, बेहडा, तुळस अशा अनेक वनस्पती त्यांचा औषधी म्हणून उपयोग केला जात असतो.
अनेक प्रकारची खनिज संपत्ती आपल्याला सागरातून मिळत असते.
- त्यामध्ये थोरियम हे देखील सागरातून मिळते. त्याचा वापर अणुऊर्जा निर्मितीमध्ये करतात.
- मॅग्नेशियम याचा वापर कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्ब मध्ये करतात.
- पोटॅशियम चा वापर साबण, काच, खत निर्मिती यामध्ये केला जातो.
- सोडियम चा वापर कापड कागद निर्मिती यामध्ये केला जातो.
- सल्फेट याचा वापर कृत्रिम रेशीम तयार करण्यासाठी करतात.
सागरामध्ये काही जैविक साधन संपत्तीचा सुद्धा समावेश होत असतो.
- त्यामध्ये कोळंबी, सुरमई, पापलेट असे अनेक प्रकारचे मासे प्रथिने व जीवनसत्वे यांचे स्त्रोत असल्याकारणाने अन्न म्हणून उपयोग करतात.
- सुकट बोंबील यांची बुकटी कोंबड्याचे खाद्य तसेच उत्तम खत म्हणून देखील शेतीसाठी वापर करतात.
- शिंपले यांचा उपयोग औषध निर्मिती, अलंकार शोभेच्या वस्तू निर्माण करण्यासाठी केला जातो.
- अनेक प्रकारच्या बुरशी प्रतिजैविकांची निर्मिती करत असतात.
- शार्क, कॉड यासारखे मासे अ, ड, ई जीवनसत्वयुक्त तेल निर्मितीसाठी वापर करत असतात.
भारतात सागर तळातून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी 1974 मध्ये मुंबई हाय या ठिकाणी सागर सम्राट ही पहिली खनिज तेल वीहीर खणली गेली होती. या विहिरीमधून मिळणारा नैसर्गिक वायू पाईपलाईन करून उरण या ठिकाणी वाहून आणला जातो.