UDISE+ मध्ये विद्यार्थी कसे अपडेट करावेत?
विद्यार्थी प्रमोशन कसे करावे ?
यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा.
खालील लिंक ला क्लिक करून यु-डायस प्लस UDISE+ ओपन करा.
लिंक ओपन करण्यापूर्वी सर्व सूचना खूप काळजीपूर्वक वाचा.
Select State to Login च्या खाली जो विंडो दिला आहे त्यातील Select State वर असलेल्या ड्रॉप डाऊन ऍरो ला क्लिक करा.
आपले राज्य MAHARASHTRA निवडा.
GO बटणावर क्लिक करा.
https://sdms.udiseplus.gov.in/#/login
आता तुमच्या समोर जो नवीन इंटरफेस येईल त्यात एक चौकोन आहे व त्या चौकोनाच्या निळ्या अक्षरात......
MAHARASHTRA असा जो शब्द लिहिला आहे त्यावर क्लिक करा.
आता तुमच्या मोबाईल च्या स्क्रीन वर UDISE+ ला Sign in करण्यासाठी इंटरफेस येईल.
या इंटरफेस वर Sign in च्या खाली......
USERNAME ID
PASSWORD
CAPTCHA
हे तीन विंडो दिसतील. त्यात USERNAME मध्ये तुमच्या शाळेचा युडायस क्रमांक व PASSWORD मध्ये तुमचा युडायस प्लस चा पासवर्ड टाका. दिलेला कॅप्चा अचूक भरा.
आता Log In करा
आता तुमच्या मोबाईल च्या स्क्रीन इंटरफेस वर दोन चौकोन दिसतील....
1) निळ्या रंगाचा चौकोन : Academic Year - 2022-23
2) केशरी रंगाचा चौकोन : Academic Year - 2023-24
आपल्याला 2023-24 मध्ये विद्यार्थ्यांचे प्रमोशन करायचे आहे. त्यामुळे केशरी रंगाच्या चौकोनाला क्लिक करा.
आता तुम्ही UDISE+ SDMS च्या मुख्य पेज वर आला आहात.
यात तुम्हाला तुमच्या शाळेचे नाव, udise नंबर व इतर माहिती दिसेल.
आता तुमच्या मोबाईल स्क्रीन वर अगदी वर डाव्या बाजूला ज्या पाच आडव्या रेघा दिसतात त्यावर क्लिक करा.
यात तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. यातील Progression Activity - New या पर्यायावर क्लिक करा
आता पुढे येणाऱ्या इंटरफेस वर तुम्हाला तीन विंडो दिसतील त्यापैकी Progression Module या विंडो ला क्लिक करा.
त्यासाठी समोर असलेल्या Go बटनाला क्लिक करा
आता पुढे येणाऱ्या इंटरफेस वर थोडे खाली या. आता तुम्हाला पुन्हा 2 विंडो दिसतील.
1) Select Class-: या विंडो च्या ड्रॉपडाऊन ऍरो ला क्लिक करा व आपली इयत्ता निवडा.
2) Select Section-: या विंडो च्या ड्रॉपडाऊन ऍरो ला क्लिक करा व आपली तुकडी निवडा
आता GO बटणावर क्लिक करा.
लगेचच त्याच इंटरफेस वर खाली तुम्हाला त्या वर्गातील सर्व मुलांची नावे दिसतील. त्या प्रत्येक नावापुढे तुम्हाला पुढील विंडो दिसतील. त्यात योग्य ती माहिती भरा.
1) Promotion Satus(2022-23) - ड्रॉपडाऊन ऍरो ला क्लिक करा. तुम्हाला पुढील पर्याय दिसतील.
Pramoted -पुढच्या वर्गात पाठवला.
Not Passed - पास झाला नाही.
Pramoted Without Examination- परीक्षा न देता पुढील वर्गात गेला.
Left School before Examination- परीक्षा देण्याअगोदर शाळा सोडली.
Repeater by Choice - त्याच वर्गात ठेवला.
यापैकी योग्य तो पर्याय निवडा.
2) Marks % 2022-23-
यात त्या विद्यार्थ्यांला शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या द्वितीय सत्रांत परीक्षेत/संकलित चाचणी-2 मध्ये सर्व विषयात जे गुण मिळाले आहेत त्या सर्व गुणांची जी टक्केवारी येते ती भरावी लागेल.
3) No of days school attended 2022-23 : यात त्या विद्यार्थ्यांची त्या वर्षाची एकूण शालेय उपस्थितीचे दिवस भरावेत.
Schooling Status 2023-24 : यात असलेल्या
Schooling Status 2023-24 : यात असलेल्या ड्रॉप डाउन ऍरो ला क्लिक करा.
Studying in same school - 2023-24 ला त्याच शाळेत शिकतो.
Left School with TC/Without TC - लि.स. घेऊन/घेतल्याशिवाय शाळा सोडली
यापैकी जो पर्याय योग्य असेल त्यावर क्लिक करा.
Class & Section to be Promoted - कोणत्या तुकडीत प्रमोट केले?
यात असलेल्या ड्रॉप डाउन ऍरो ला क्लिक करा व योग्य त्या तुकडी वर क्लिक करा.
Status - अजून तुम्ही विद्यार्थ्यांचे पुढच्या वर्गात प्रमोशन केले नाही म्हणून status - pending असेच येईल.
Action - कोणती कृती करायची आहे?
Update - आतापर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांची जी माहिती भरली आहे त्या माहितीला अपडेट करायचे असल्यास Update वर क्लिक करा.
correction - जर तुम्ही अगोदरच अपडेट केलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीत काही चुका होत्या त्या दुरुस्त केल्या असतील तर Correction वर क्लिक करा.
आता तुमची विद्यार्थ्यांची माहिती अपडेट झाली आहे. आता status done म्हणून शो करेल.
अशाच रीतीने सर्व विद्यार्थ्यांची माहिती अचूक भरा.
Finalize -
एकदा का तुम्ही तुमच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती अचूक भरली की याच टॅब वर सर्वात खाली Finalize नावाचे निळ्या रंगाचे बटन आहे. त्यावर क्लिक करा.
सर्व वर्गांचे(जेवढ्या असतील तेवढ्या इयत्ता) काम Finalize झाले की तुमच्या संपूर्ण शाळेच्या कामाचे Finalize चे बटन क्लिक करा म्हणजे तुमचे संपूर्ण शाळेचे काम झाले.
शेवटी तुम्हाला खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल.