प्रश्नपेढी
इयत्ता 7 वी - विज्ञान
प्रश्नपेढी |
इयत्ता 7 वी विज्ञान विषयातील काही घटकावर महत्त्वाच्या प्रश्नांची प्रश्नपेढी तयार करण्यात आलेला आहे. ही प्रश्नपेढी वाचून विद्यार्थ्यांनी वहीत सोडवण्याचा प्रयत्न करावा. या प्रश्नपेढीमध्ये पाठातील सर्व प्रकारच्या संकल्पना स्पष्ट होतील या दृष्टीने ही प्रश्नपेढी तयार करण्यात आली आहे. ही प्रश्नपेढी तयार करत असताना विद्यार्थ्यांनी या इयत्तेमध्ये मध्ये साध्य करावयाच्या अध्ययन निष्पत्तींचा सुद्धा विचार करण्यात आलेला आहे. अध्ययन निष्पत्तींना अनुसरून त्या त्या उपघटकावर प्रश्न तयार करण्यात आलेले आहेत.
या प्रश्नांचा विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देताना नक्कीच उपयोग होईल यात शंका नाही. अधिक सराव होण्याच्या दृष्टीने हि प्रश्न्पेढी महत्वाची ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी हे प्रश्न व यांची उत्तरे वहीवर लिहून काढले तर त्यांना निश्चितच याचा फायदा होणार आहे.
ही प्रश्नपेढी खालील घटकावर आधारित आहे.
- मानवी स्नायू व पचन संस्था
- मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे
- नैसर्गिक साधन संपत्ती
- प्रकाशाचे परिणाम
वरील घटकातील महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश प्रश्नपेढीमध्ये करण्यात आला आहे. घटकातील सर्व संबोध आणि संकल्पना स्पष्ट होतील या दृष्टिकोनातून प्रश्न निर्माण करण्यात आलेले आहेत. एखाद्या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या एखाद्या प्रश्नांमध्ये सुद्धा सापडू शकते. विद्यार्थ्यांनी घटकाचे सविस्तर अध्ययन करून प्रश्नपेढी सोडली तर ते अधिक उपयुक्त होईल.
प्रश्नपेढी क्र. 1 - इयत्ता 7 वी - विज्ञान - सोडवा
मानवी स्नायू व पचन संस्था
- मानवी शरीराच्या सुमारे किती टक्के वजन स्नायूंचे असते?
- मानवी चेहऱ्यामध्ये किती स्नायू असतात?
- हात आणि पाय यांच्यामध्ये कोणते स्नायू असतात?
- मानवी शरीरात अनैतिक स्नायू कुठे असतात?
- स्नायूंच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात?
- मानवी शरीरातील सर्वात लहान स्नायू कुठे असतो?
- दातावर कोणत्या कठीण पदार्थाचे आवरण असते?
- आपल्या शाळेमध्ये कोणते विकर असते?
- एनमल हे कोणत्या शहरापासून बनलेले असते?
- मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?
- लहान आतडे सुमारे किती मीटर लांब असते?
- ग्लुकोजचा साठा करणे हे मुख्य कार्य कोणाचे आहे?
- स्निग्ध पदार्थाच्या पचनास कशामुळे मदत होत असते?
- लहान आतड्यात किती पाचक रस मिसळतात?
- स्वादुपिंडातून जो स्त्रव स्त्रवतो त्याला काय म्हणतात?
- जठरातील अन्न आम्लधर्मी करण्यासाठी त्यात कोणते घटक मिसळले जाते?
- मोठ्या आतड्याची लांबी सुमारे किती मीटर असते?
- लाळे मध्ये कोणता पाचकरस असतो?
- पिष्टमय पदार्थाचे रूपांतर मारतोजमध्ये करण्यासाठी कोणती ग्रंथी मदत करते?
- पचनाची क्रिया कोठे सुरू होते?
- पापण्यांमध्ये कोणत्या प्रकारचे स्नायू असतात?
घटक निहाय सराव चाचणी सोडवण्यासाठी
मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे
- काही द्रव्ये दोन किंवा अधिक पदार्थांनी बनलेले असतात त्यांना काय म्हणतात?
- एकच घटक असलेल्या द्रव्याला वैज्ञानिक परिभाषेत काय म्हणतात?
- ज्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अनु असतात त्या पदार्थांना काय म्हणतात?
- आतापर्यंत शास्त्रज्ञांनी किती मूलद्रव्यांचा शोध लावला आहे?
- निसर्गात किती मूलद्रव्य आढळतात?
- मूलद्रव्यांच्या लहान कणांना अनु हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने दिले?
- अनु निर्माण करता येत नाही त्याचे लहानपणांमध्ये विभाजन करता येत नाही असा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला?
- मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची पद्धत कोणत्या शास्त्रज्ञाने सुरू केले?
- सोने या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे?
- जी मूलद्रव्य काही प्रमाणात धातू तसेच अधातूचे गुणधर्म दर्शवतात त्यांना काय म्हणतात?
- आपल्या घरातील विद्युत दिव्यामध्ये जीता रस्ते ती कोणत्या मूलद्रव्यांपासून बनवलेली असते?
- संमिश्रांची दोन उदाहरणे सांगा?
- दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे काय?
- पाणी हे मिश्रण आहे की संयोग आहे?
- पाण्याचा एक रेणू तयार होण्यासाठी त्यात हायड्रोजनचे किती आणू लागतील?
- अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग होतो?
- प्रयोग शाळेत द्रव आणि स्थायूंच्या मिश्रणातून स्थायू वेगळे करण्यासाठी कोणत्या यंत्राचा उपयोग होतो?
- खालील मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहा.
- बोरॉन, कार्बन, निऑन, क्लोरीन आणि कॅल्शियम
नैसर्गिक साधन संपत्ती
- धातूका पासून धातू मिळवण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते?
- ज्या खनिजांमध्ये धातूचे प्रमाण जास्त असते त्याला काय म्हणतात?
- भूगर्भात मिठाचे साठे सापडतात या खनिज मिठाला काय म्हणतात?
- इंडियन स्कूल ऑफ माईन ही संस्था कोठे आहे?
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
- अभ्रक हे विद्युत वाहक आहे की विद्युत रोधक आहे?
- उच्च प्रतीच्या कोळशाला काय नाव आहे?
- प्रोडूसर गॅस, वॉटर गॅस या वायुरूप इंधनाची निर्मिती कशापासून केली जाते?
- तेल आणि नैसर्गिक वायु महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
- भारतातील सर्वात मोठी तेल आणि वायू संशोधन आणि उत्पादन कंपनी कोणती?
- ONGC या तेल संशोधन कंपनीचे मुख्यालय कोठे आहे?
- जीवाश्म म्हणजे काय?
- नैसर्गिक वायू मधील मुख्य घटक कोणता?
- CNG चा फुल फॉर्म काय आहे?
- ब्लॅक गोल्ड असे वर्णन कशाचे केले जाते?
- पेट्रोलियम गॅस मध्ये प्रोपेन आणि ब्युटेन यांचे प्रमाण किती असते?
- LPG वायूची गळती समजण्यासाठी त्यात कोणते रसायन मिसळलेले असते?
- जगाच्या एकूण भूभागांपैकी सुमारे किती टक्के भूभाग जंगलांनी व्यापलेला आहे?
- मलेरियावर औषध म्हणून कोणत्या वनस्पतीचा वापर केला जातो?
- कॅन्सरवर उपचार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीच्या अर्काचा उपयोग होतो?
- भारतातील पहिली खनिज तेल विहीर कोठे खणली गेली?
- भारतातील पहिल्या खनिज तेल विहिरीचे नाव काय?
- कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्ब मध्ये कशाचा वापर केला जातो?
- शार्क कॉड या माशांमध्ये कोणते जीवनसत्वयुक्त तेल असते?
घटक निहाय सविस्तर अभ्यास करण्यासाठी
प्रकाशाचे परिणाम
- आकाश निळे का दिसते?
- सूर्यग्रहणामध्ये पृथ्वी चंद्र सूर्य यांची स्थिती कशी असते?
- सूर्यग्रहण अमावस्येला होते की पौर्णिमेला?
- सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी का बघू नये?
- पृथ्वीवरून पाहताना चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा जातो त्या स्थितीला काय म्हणतात?
- 2016 मध्ये चंद्राच्या मागे कोणता तारा लपला गेला होता?
- ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला काय म्हणतात?