इयत्ता सातवी विज्ञान विषयातील सर्व घटकावर आधारित परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. यामध्ये या इयत्तेतील महत्त्वाच्या संकल्पनांचा समावेश केलेला आहे. अध्ययन निष्पत्ती डोळ्यासमोर ठेवून त्या साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील या गोष्टींचा सर्वांगाने विचार करून खालील महत्त्वाचे मुद्दे देण्यात आलेले आहेत. कोणत्याही परीक्षेला जाता जाता अगदी कमी वेळामध्ये संपूर्ण इयत्तेची उजळणी होण्याच्या दृष्टीने सर्व मुद्दे देण्यात आलेले आहेत. या मुद्द्यांचे वाचन करून गेल्यास परीक्षेला निश्चितच फायदा होईल.
परीक्षेला जाता जाता वाचूया अत्यंत महत्त्वाचे मुद्दे.
- हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो, हे तत्व डॅनियल बर्नोली या शास्त्रज्ञाने मांडले.
- पाण्याची घनता 4 अंश सेल्सिअस तापमानाला सर्वात जास्त असते तर त्याच तापमानाला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते.
- पोयटा मृदेची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता खूप जास्त असते. या मृदेलाच गाळाची मृदा असेही म्हणतात.
- आम्लयुक्त मृदा - pH 6.5 पेक्षा कमी
- उदासीन मृदा - pH 6.5 ते 7.5
- आम्लारीधर्मी मृदा - pH 7.5 पेक्षा जास्त.
- पाणी गोठताना त्याचे आकारमान वाढते.
- रायझोबियम हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांवरील असलेल्या गाठींमध्ये असतात.
- मातीमधील आझिटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात.
- फॉस्फरस हे पोषक द्रव्य प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करते. तर पोटॅशियम हे चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक असते.
- मॅग्नेशियम आणि लोह ही पोषक द्रव्य हरितद्रव्य निर्माण करण्यासाठी उपयुक्त असतात.
- 16 ऑक्टोबर हा जागतिक अन्नसुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो.
- 13 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो.
- मीठ,साखर, तेल हे नैसर्गिक परिरक्षक आहेत. तर सायट्रिक आम्ल, सोडियम बेंजोएट, नायट्रेट हे रासायनिक परिरक्षक आहेत.
- 1954 मध्ये अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा तयार करण्यात आला.
- लांबी रुंदी क्षेत्रफळ वस्तुमान तापमान घनता कालावधी या अदिश राशी आहेत.
- विस्थापन, वेग, वजन या सदिश राशी आहेत.
- 1 TMC पाणी म्हणजे One Thousand Million Cubic feet म्हणजे एक अब्ज घनफुट पाणी होय.
- 1 घन फूट म्हणजे 28.317 लिटर
- प्रत्येक अणू हा विद्युत दृष्ट्या उदासीन असतो.
- ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला तडीत रक्षक म्हणतात. तडीत रक्षक म्हणजे तांब्याची एक लांब पट्टी.
- महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखी मुळे निर्माण होणाऱ्या लाटांना त्सुनामी लाटा म्हणतात.
- त्सुनामी हा जपानी शब्द आहे. त्सुनामी याचा अर्थ किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट होय.
- रॉबर्ट हूक या शास्त्रज्ञाने १६६५ मध्ये पेशीचा शोध लावला.
- एम जे श्लायडेन व थिओडोर श्वान या दोन शास्त्रज्ञांनी 1838 साली पेशींच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला की, सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे.
- आर. वीरशॉ यांनी सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो असे स्पष्ट केले.
- सूक्ष्म जीवांचा आकार हा 100 मायक्रोमीटर पेक्षा लहान असतो.
- पोलिओचा विषाणू 28 नॅनो मीटरचा असतो. तर टायफाईड चा रोगजंतू 1 ते 3 मायक्रोमीटरचा असतो.
- राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था पुणे येथे आहे. ही संस्था पेशी विज्ञान जैवतंत्रज्ञान यासंदर्भात संशोधनाचे कार्य करते.
- सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला किण्वन किंवा आंबणे किंवा कुजणे असे म्हणतात.
- निरोगी मानवी शरीराचे तापमान सुमारे 37 अंश सेल्सिअस इतके असते.
- मानवी शरीरात 600 पेक्षा अधिक स्नायू असतात. प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे 40 टक्के वजन स्नायूंचे असते. मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास 30 स्नायू असतात.
- स्नायूंच्या अभ्यास शास्त्राला myology असे म्हणतात तर हाडांच्या अभ्यासाला Osteology असे म्हणतात.
- यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून याचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे होय.
- आतापर्यंत शास्त्रज्ञांनी 118 मूलद्रव्यांचा शोध लावला आहे. त्यांपैकी 92 मूलद्रव्य हे निसर्गात आढळतात तर इतर मूलद्रव्ये मानवनिर्मित आहेत.
- अणू निर्माण करता येत नाही त्याचे लहान कणांमध्ये विभाजन करता येत नाही. अणू नष्टही करता येत नाही हा सिद्धांत जॉन डाल्टन यांनी 1803 मध्ये मांडला.
- 1926 साली Indian School of Mines ही संस्था खाणकाम शिक्षणाच्या संदर्भात धनबाद येथे स्थापन झाली होती. ती संस्था आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून कार्य करत आहे.
- भूगर्भात मिठाचे साठे सापडतात. हे खनिज मीठ सैंधव मीठ किंवा शेंदेलोन या नावाने ओळखले जाते.
- तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाची (ONGC) स्थापना 14 ऑगस्ट 1956 रोजी झाली ते भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयांतर्गत कार्य करत असते. ONGC ही भारतातील सर्वात मोठी तेल आणि वायु संशोधन आणि उत्पादन कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.
- नैसर्गिक वायू मध्ये मिथेन हा मुख्य घटक असतो.
- खनिज तेलाला लिक्विड गोल्ड - Luquid Gold असे म्हणतात. तर दगडी कोळशाला ब्लॅक गोल्ड - Black Gold म्हणून ओळखले जाते.
- LPG या वायूमध्ये प्रोपेन आणि ब्युटेन हे दोन घटक 30 : 70 या प्रमाणात असतात. हा वास रहित असणारा वायू आहे कोणत्याही कारणाने त्याची गळती झाल्यावर समजून येण्यासाठी त्यामध्ये इथील मरकॅप्टन हे तीव्र व विशिष्ट वासाचे रसायन अल्प प्रमाणात मिसळलेले असते.
- भारतात समुद्राच्या तळातून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी मुंबई हाय या ठिकाणी सागर सम्राट ही पहिली खनिज तेल विहीर 1974 साली खानली गेली.
- एका सेकंदात किती दोलने झाली याला वारंवारिता म्हणतात. वारंवारिता ही हर्ट्झ या एककामध्ये व्यक्त करतात. एक हर्ट्झ म्हणजे एका सेकंदात एक दोलन.
- ढोलकाचांदोलन काल हा दौलखाच्या लांबीवर अवलंबून असतो ढोलकाची लांबी वाढवल्यास ढोलकाचा दोलन कालही वाढतो.
- ध्वनी पातळी ही डेसिबल या एककात मोजतात.
- मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारिता 20 Hz 20,000 Hz या दरम्यान असते.
- ज्या ध्वनीची वारंवारिता 20 Hz पेक्षा कमी असते अशा ध्वनीला अवश्राव्य ध्वनी असे म्हणतात. 20Hz पेक्षा कमी वारंवारीतेचे ध्वनी व्हेल मासे, हत्ती, गेंडा या प्राण्यांद्वारे काढले जातात.
- 20,000 Hz पेक्षा अधिक वारंवारीतेचे ध्वनीला श्राव्यातीत किंवा स्वनातीत ध्वनी म्हणतात. हे ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाहीत. परंतु कुत्रा हा अशा प्रकारचे ध्वनी ऐकू शकतो.
- सूर्य चंद्र हे तारे पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळताना दिसतात. याचे कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते.
- तारे दररोज 4 मिनिटे लवकर उगवतात आणि चार मिनिटे लवकर मावळतात.
- चंद्र एक पृथ्वी प्रदक्षिणा सुमारे 27.3 दिवसात पूर्ण करतो.
- ध्रुवतारा नेहमी उत्तर दिशा दर्शवितो.
- आयुका ही पुणे येथील संस्था खगोल विज्ञानामध्ये मूलभूत संशोधनाचे कार्य करते.
- आयुका - Inter University centre for astronomy and astrophysics.