इयत्ता सहावी विज्ञान विषयातील सर्व घटकावर आधारित अत्यंत महत्त्वाचे मुद्दे - भाग 1

 


           इयत्ता सहावी विज्ञान विषयातील सर्व घटकावर आधारित परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. यामध्ये या इयत्तेतील महत्त्वाच्या संकल्पनांचा समावेश केलेला आहे. अध्ययन निष्पत्ती डोळ्यासमोर ठेवून त्या साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील या गोष्टींचा सर्वांगाने विचार करून खालील महत्त्वाचे मुद्दे देण्यात आलेले आहेत. कोणत्याही परीक्षेला जाता जाता अगदी कमी वेळामध्ये संपूर्ण इयत्तेची उजळणी होण्याच्या दृष्टीने सर्व मुद्दे देण्यात आलेले आहेत. या मुद्द्यांचे वाचन करून गेल्यास परीक्षेला निश्चितच फायदा होईल. 

परीक्षेला जाता जाता वाचूया अत्यंत महत्त्वाचे मुद्दे.

  • पृथ्वीवर 29 टक्के जमीन तर 71 टक्के पाणी आहे.
  • एकूण पाण्यापैकी 97 टक्के पाणी हे समुद्रात खाऱ्या स्वरूपात उपलब्ध आहे.
  • तर उरलेल्या 3 टक्क्यांमध्ये 2.7 % पाणी बर्फाच्या स्वरूपात आहे. तर केवळ 0.3% पाणी पिण्यासाठी  उपलब्ध आहे.
  • पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणामध्ये नायट्रोजन चे प्रमाण 78 % असते. ऑक्सिजनचे प्रमाण 21% असते. अरगॉन 0.9%, कार्बन डाय-ऑक्साइड 0.03% तर इतर वायू व घटक हे 0.07% असतात.
  • पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचे खालून वर जात असताना तपांबर, स्थितांबर, मध्यांबर आयनंबर आणि बाह्यांबर असे थर असतात.
  • तपांबरांमध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे 80 टक्के वायू असतात. स्थितांबर मध्ये त्यापेक्षा मध्यंबर, त्यापेक्षा तपांबर मध्ये हवेचे प्रमाण कमी होत जाते. बह्यांबर मध्ये हवा नसते.
  • अरगॉन वायुचा उपयोग विजेच्या बल्ब मध्ये करतात.
  • खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजन वायूचा उपयोग होतो.
  • जाहिरातीसाठी च्या रस्त्यावरच्या दिव्यात निऑन वायूचा वापर केला जातो.

परीक्षेला जाता जाता वाचूया 7 वी विज्ञान विषयातील महत्त्वाचे मुद्दे.

  • 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो.
  • पाणी हे वैश्विक विद्रावक आहे.
  • कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान साधारणपणे 12 ते 18 वर्षे असते तर शहामृग हा पक्षी सुमारे 50 वर्षे जगतो.शहामृग पेक्षा गरुडाचे आयुर्मान जास्त असते.
  • वनस्पतीची उंची व आकार खोडावर अवलंबून असतो.
  • राफलेशिया अरनोल्डी या वनस्पतीचे फुल जगात सर्वात मोठे फुल म्हणून ओळखले जाते. ही वनस्पती इंडोनेशिया या देशामध्ये आढळते.
  • वुल्फिया या वनस्पतीचे फुल जगातील सर्वात लहान फुल आहे.
  • घार गरुड कावळा यासारखे जे हवेमध्ये संचार करतात त्यांना खेचर असे म्हणतात.
  • पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन येथे 2014 मध्ये दुर्घटना झाली होती. तेथील डोंगरकडा कोसळल्याने माती आणि दगड यांच्या निघाऱ्याखाली गावातील अनेक माणसे गाडली गेली व मृत्युमुखी पडली.
  • राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना 2005 मध्ये करण्यात आली.
  • पदार्थाची वैशिष्ट्ये ही त्यांच्या अवस्थांवर आणि कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे जे. विलार्ड गिब्ज या शास्त्रज्ञाने दाखवून दिले.
  • पाण्याची वाफ थंड झाली तर एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते या क्रियेला संघनन असे म्हणतात वाफेचे संगणक शंभर अंश सेल्सिअस ला होते.
  • म्हणजेच पाण्याचा उत्कलनांक व संघनन बिंदू हा एकच असतो.
  • बर्फाला उष्णता दिली की ते वितळू लागते म्हणजे द्रवात रूपांतर होऊ लागते याला विलयन असे म्हणतात. बर्फाचे विलयन 0 अंश सेल्सिअस ला होते. म्हणजे पाण्याचा गोठणबिंदू व विलय बिंदू हा एकच असतो.
  • फ्रिजच्या फ्रिजर मधील हवेचे तापमान सुमारे -18 अंश सेल्सिअस इतके असते.
  • स्थायुरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू मध्ये रूपांतर होणे या अवस्थांतराला संप्लवन असे म्हणतात.
  • भारतात रबराचे सर्वात जास्त उत्पादन केरळ या राज्यात होते.
  • वर्तमानपत्रांसाठी कागद तयार करणारा भारतातील पहिला कारखाना 1955 मध्ये नेपानगर - मध्य प्रदेश येथे स्थापन झाला.
  • महाराष्ट्रामध्ये कागद तयार करणारा कारखाना चंद्रपूर जवळ बल्लारपूर येथे आहे.
  • रेशीम कीटकाच्या एका कोशापासून रेशीम हा धागा पाचशे मीटर ते तेराशे मीटर पर्यंत लांबीचा मिळतो.
  • नायलॉन या धाग्याचा शोध न्यूयॉर्क व लंडन येथे एकाच वेळी लागल्याने न्यूयॉर्कचे Ny व लंडनचे Lon ही अक्षरे एकत्र करून नायलॉन हे नाव देण्यात आले.
  •  शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजनचे वहन करण्याचे काम लोह हे खनिज करत असते. लोहाच्या अभावामुळे ॲनिमिया (पांडूरोग) होत असतो.
  • ब आणि क हे जीवनसत्व पाण्यात विरघळणारी आहेत तर इतर जीवनसत्व पाण्यात विरघळत नाहीत.
  • अ जीवनसत्वामुळे डोळ्याचे रक्षण होते. त्वचा, दात, हाडे निरोगी राहतात. अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा विकार होतो.
  • क जीवनसत्वामुळे शरीराच्या उतींचे रक्षण होते. हिरड्या, दात, हाडे यासाठी आवश्यक असलेले हे प्रथिन तयार करतात. या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे  स्कर्वी हा आजार होतो.
  • दात आणि हाडे चांगले राहण्यासाठी पुरेसे कॅल्शियम आणि फॉस्फरस अन्नातून शोषून घेण्याचे काम करते. या जीवसत्त्वाच्या अभावामुळे मुडदूस हा आजार होतो.
  • के जीवनसत्वामुळे रक्त साकाळण्यास मदत होते. इजा झाल्यास फार रक्तस्त्राव होण्यापासून बचाव होतो.
  • क्ष किरण प्रतिमेचा शोध राँटजेन या शास्त्रज्ञानी लावला.
  • डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून कवटी बनते. डोक्यात 8 आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी एकूण 22 हाडे कवटीमध्ये असतात.
  • पाठीच्या कण्यामध्ये एकूण 33 हाडे असतात.
  • मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कडी हे असून हे हाड कानामध्ये असते.
  • मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड मांड्यामध्ये असून त्याला उर्विका असे म्हणतात.
  • बिजागिरीच्या सांध्यांची हालचाल 180 अंश कोणात होत असते. कोपरा व गुडघ्यात अशा प्रकारचे सांधे असतात.
  • उखळीच्या सांध्यांचे हालचाल ३६० अंश कोणात होत असते खांदा व खुबा यामध्ये अशा प्रकारचे सांधे असतात.